WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC English Board Paper दहावी बोर्डाच्या इंग्रजी पेपराआधी शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांचे चिंता वाढली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC English Board Paper आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत याआधी आता बारावीचे पेपरचा संपत आले परंतु दहावीचा पहिलाच पेपर झालेला आहे आणि राज्यात सर्वत्र कॉप्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे याबाबत सुद्धा दहावीचा पुढचा पेपर आहे इंग्रजीचा आहे त्या आधीच शिक्षण मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे विस्तार माहिती आपण पाहूय

SSC English Board Paper पूर्ण माहिती

राज्यातील दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण मंत्र्यांनी आता थेट एक मोठा निर्णय घेतलेला आहे काल मराठी बोर्डाचा पेपर झाला यामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मराठीचा बोर्डाचा पेपर फुटला त्यामुळे बोर्डावर परत एकदा कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला पाहायला मिळालेला आहे मग आता शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात माहिती सविस्तर बघुयत

SSC English Board Paperजालन्याच्या बदनापूरच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याचा (SSC Exam Paper Leak) प्रकार शुक्रवारी (दि. 21) उघडकीस आला. एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर फुटल्याने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात शिक्षण अधिकारी मंगला धूपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचार्‍याचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दहावी (SSC exam) बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर (Exam) फुटला. मराठीचा पेपर सुरू सकाळी 11 वाजता झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रावर उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळत असल्याचे समोर आले आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात होत्या. तर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील देखील दिसून आली.

बदनापूर परीक्षा पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक

यानंतर शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षण मंडळाच्या आदेशानंतर जालना जिल्हा प्रशासनाने प्रकरणाचा तपास करत कारवाई केली आहे. बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बदनापूर येथील ज्या सीएससी केंद्रावरून झेरॉक्स केल्या जात होत्या. त्या सीएससी केंद्र चालकासह, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय म्हणाले शिक्षणमंत्री?

दरम्यान, पेपरफुटीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काही ठिकाणी कॉपी झाली. कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले, तशा चित्रफितही प्रसार माध्यमातून पुढे आल्या. त्याची निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे. यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याच बरोबर यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे. त्या केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. कॉपी पुरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ते केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जाईल, असे दादा भुसे यांनी म्हटले.

राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्र कॉपी प्रकरण होतील त्या शाळेचे कायमची मान्यता रद्द करण्यात आणि तिथे जपून मदत करत असतील तर त्यांच्या वतीतील गुन्हा दाखल करणार

बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले

दहावी बारावी बोर्डाच्या महामंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितलेला आहे की कॉपी प्रकरण याबाबत त्यांना मिळवल्याने विचारला असता त्यांनी सांगितलं की दहावी बोर्डाचा पेपर व्यवस्थित झालेला आहे कुठेही पेपर फुटलेला नाहीये त्यांनी या बातमीचा खंडन केलेला आहे परंतु असा जर कुणी गैरप्रकार केला तर त्याच्यावर कारवाई होईल

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावीच्या इंग्रजीच्या पेपर आधी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment