SSC English Answer key today आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरानंतर विद्यार्थ्यांना पाच गुण हे कसे मिळणार आहेत कोणाला हे पाच गुण मिळणार आहेत या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत हे पाच गुण मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे आणि बोर्डाने कोणती अशी योजना आखली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना हे पाच गुण महत्त्वाचे मिळणार आहे
SSC English Answer key today पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक एक गुण हा भरपूर महत्त्वाचा असतो कारण एक एक गुणामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे मेरिट राहून जातं काही विद्यार्थी एका गुणामुळे नापास होतात काही विद्यार्थ्यांना एका गुणामुळे परीक्षेत किंवा पुढच्या प्रवेश प्रक्रियेत ऍडमिशन मिळत नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला थेट बोर्डा करून पाच गुण मिळणार आहे नेमके हे पाच गुण कशामुळे मिळणार आहेत या पाच गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक मोठे आनंदाचे वातावरण आहे तर हे पाच गुण तुम्हाला मिळवण्यासाठी काय करायचं आहे बोर्डाची अशी कुठली योजना आहे ज्यामुळे हे पाच गुण तुम्हाला मिळणार आहे बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
SSC English Answer key today महाराष्ट्र शिक्षण मंडळाने ठरवले आहे की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जर समाजासाठी एक विशिष्ट काम केलं, तर त्यांना 1 ते 10 पर्यंत अतिरिक्त गुण मिळतील.
ही योजना ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत येते. यामध्ये विद्यार्थ्यांनी किमान 5 निरक्षर व्यक्तींना साक्षर केल्यास त्यांना 5 अतिरिक्त गुण मिळतील.याशिवाय, कला, क्रीडा स्पर्धा, एनसीसी, स्काऊट आणि गाईडसारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास आणखी 5 गुण मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, एकूण 10 बोनस गुण मिळू शकतात!
या निर्णयाचा उद्देश काय?
शिक्षण संचालनालयाच्या मते, भारतात अजूनही लाखोलोक निरक्षर आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 1 कोटी 62 लाखांहून अधिक लोकांना वाचता-लिहिता येत नाही.त्यामुळे सरकारने ठरवलंय की विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी उचलावी आणि शिक्षण प्रसारासाठी हातभार लावावा. आणि याचा फायदा त्यांना बोर्डाच्या परीक्षांमध्ये मिळावा.
ग्रेस मार्क्स मिळवण्यासाठी काय करायचं?
जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रयत्न करावे लागतील-
1. कमीत कमी 5 निरक्षर लोकांना साक्षर करणे (5 गुण) वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवणे गरजेचे.हे काम पूर्ण झाल्यावर शाळेकडून प्रमाणपत्र मिळेल,
2. कला, क्रीडा किंवा इतर उपक्रमांमध्ये सहभाग (5 गुण) खेळ, चित्रकला, संगीत, नाट्य यासारख्यास्पर्धांमध्ये भाग घ्या.राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यश मिळवा.
विद्यार्थ्यांना होणार फायदा
बोर्ड परीक्षेतील तणाव कमी होईल एका गुणाने मेरिट लिस्टमध्ये मोठा फरक पडू शकतो! या बोनस गुणांमुळे विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्येप्रवेश घेऊ शकतील.शिक्षण प्रसाराला मदत होईल जर विद्यार्थीच शिक्षक बनले, तर शिक्षणाची गती वाढेल आणि समाजात परिवर्तन घडेल.व्यक्तिमत्त्व विकास सामाजिक कार्यातसहभागी होणे हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी एक मोलाचा अनुभव ठरेल.सुपर बोनस दोन फायद्यांचा डबल धमाका! -एकीकडे शिक्षणासाठी काम करता येईल, आणि दुसरीकडे कला-क्रीडेत भाग घेऊन स्वतःचा विकासही करता येईल.
योजनेची अंमलबजावणी कशी होईल?
• शाळा आणि महाविद्यालये या योजनेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतील. शिक्षक विद्यार्थ्यांना निरक्षर लोकांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन करतील. साक्षरतेच्या मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेकडून नोंदणी होईल आणिप्रमाणपत्र दिले जाईल. कला-क्रीडा गुणांसाठी विद्यार्थ्यांन स्पर्धामध्ये भाग घेऊन पुरावा द्यावा लागेल. शिक्षण मंडळ सर्व आवश्यक दस्तऐवज पडताळून बोनस गुण जोडेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या परीक्षेतील पाच गुण हे आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप लवकर जॉईन करा
माझ्या हया मुली हे पाच गुण मिळ वे अशी ही नम विनंती
I want to this extra 5 marks I am ready to teach some people
मला ही ५ गुण मिलावेत
मला हि पाच गुण मिळावेत