WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School colleges sutti शाळा कॉलेज उन्हाळ्याच्या सुट्ट्या या तारखेपासून लागणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School colleges sutti आज आपण पाहणार की राज्यातील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे शाळा कॉलेज उन्हाळ्याची सुट्ट्या कोणत्या तारखेपासून लागणार याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

School colleges sutti संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे दहावी बारावी बोर्डाच्या पेपर संपल्यानंतर पहिली ते नववी यांचे पेपर आता संपणार आहेत 25 एप्रिलला हा शेवटचा पेपर होईल त्यानंतर आता सुट्ट्या कधी होतील निकाल कधी लागणार आणि नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत

School colleges sutti जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा सुरू आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार २५ एप्रिल रोजी परीक्षा संपणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागेल. तर १ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि ३ मेपासून शिक्षकांना उन्हाळा सुट्या लागतील.

दरवर्षी शाळांकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा घेतल्या जात होत्या. पण, शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा नियम आहे. त्याचे पालन होत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्वच शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा दिल्या. त्यामुळे ८ ते २५ एप्रिलपर्यंत शाळांना अंतिम सत्राची परीक्षा घ्यावी लागली.
विद्यार्थ्यांनाही त्यातून वेगळा अनुभव मिळाला.

आता फक्त शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणेच अंतिम सत्र परीक्षेचा निकाल १ मे रोजीच जाहीर करावा लागणार आहे. याशिवाय दरवर्षी निकाल जाहीर झाल्यावर शाळांना उन्हाळा सुटी लागते, पण रमजान ईदची सुटी जास्त झाल्याने शाळांची सुटी एक दिवस लांबणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

१७ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुटी
२०२५ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी १७ ते २३ ऑक्टोबरपर्यंत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांना दिवाळीची १४ दिवस सुटी असणार आहे. १७ ते ३१ ऑक्टोबर या काळात विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी असेल. याशिवाय शैक्षणिक वर्षात ५४ दिवस सार्वजनिक सुट्या (प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळून) असणार आहेत.

१५ जूनपासून शाळा सुरू होतील
चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागतील. त्यानंतर तेथून आठ दिवस शाळा सुरू राहतील आणि ३ मेपासून शिक्षकांना सुट्या असतील. नेहमीप्रमाणे १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागणार याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट सरी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment