WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School college time उन्हाळ्यामुळे या वेळेत शाळा कॉलेज भरणार शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School college time आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शाळा कॉलेज आता कोणत्या वेळेत भरणार आहेत यासाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे राज्यात उन्हाचा तडका वाढलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर त्याचा काही परिणाम आरोग्यावर होऊ नये यासाठी आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघूया की आपण आता शाळा कॉलेज यांचा वेळेचा टाइमिंग काय असेल आणि कोणत्या वेळेत आता शाळा कॉलेज भरणार आहेत बघूयात माहिती

School college time पूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यात आता मार्च महिना सुरू आहे मार्च महिन्यामध्ये देखील आता उन्हाचा तडाका भरपूर सुरू आहे यामुळे या उन्हाच्या उष्माघातामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होऊ नये त्यामुळे आता शाळा कॉलेज यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे आदेश हे शिक्षण विभागाने दिलेले आहेत विद्यार्थ्यांना आता यावर्षीपासून शैक्षणिक वर्ष देखील बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे यावर्षी एप्रिल 25 पर्यंत शाळा कॉलेज सुरू असणार आहेत त्यामुळे जास्त उन्हाचा फटका त्यांना बसू नये यासाठी काही उपाय योजना आणि काही ठराविक बदल वेळापत्रक करावे अशा प्रकारचे आदेश शिक्षण विभागाने केलेले आहे तर बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती

School college time राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.राज्यात काही ठराविक शाळा दोन सत्रात भरतात. ‘विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये’, यासाठी या शाळांनाही त्यांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याची सूचना दिली आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येत आहेत. काही जिल्ह्यांनी शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. राज्यातील सर्व शाळांच्या वेळापत्रकात एक वाक्यता असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या वेळा शिक्षण विभागाने ठरवून दिल्या आहेत.

अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळांचे असे असेल वेळापत्रक –
– प्राथमिक शाळा : सकाळी ७ ते ११.१५
– माध्यमिक शाळा : सकाळी ७ ते ११.४५

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपाययोजना कराव्यात –
– मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, मैदानात वर्ग घेऊ नयेत.
– विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
– वर्गात पंखे सुस्थितीत असावेत, थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
– उन्हात बाहेर पडणे टाळावे.
– हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
– सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे.
– डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेलचा वापर करावा.

‘राज्यातील उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता, त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा आदेश दिला आहे. काही ठराविक शाळा दोन सत्रात भरतात. अशा शाळांना विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याची सूचना देण्यात आली आहे.’
– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण

अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेज यांच्या वेळापत्रकात काय बदल झालेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment