Gudipadava muhurat sadi colour आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे त्याचप्रमाणे आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी परिधान केली पाहिजे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Gudipadava muhurat sadi colour पूर्ण माहिती
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण मराठी माणसांचा सर्वात मोठा सण ज्या नवीन वर्षाची सुरुवात मराठी माणसांची होती तो सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सर्वत्र महाराष्ट्रात उत्सव असतो प्रत्येक जण आपल्या घरावर गुढी उभारत असतो सर्व घरातील मंडळी हे आनंदी आणि नवनवीन कपडे घालून या नवीन वर्षाचे स्वागत करत असतात इंग्रजी नवीन वर्ष ज्याप्रमाणे एक जानेवारीला सुरू होते आर्थिक वर्ष 1एप्रिल ला सुरू होते त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्ष हे म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होते त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील गुढी ही कोणत्या मुहूर्तावर उभारावी आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत
Gudipadava muhurat sadi colour नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतात. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.
गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये.खरंतर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही.सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारु शकता.
कारण ज्या सूर्य किरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते. ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो. म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते.
दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते.गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं.
गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं. यामुळे घरात धान्याची भरभराट होते.
गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी, लाल, पिवळा, हिरवा या रंगांची साडी नेसवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी गुढीला नेसवण्यासाठी वापरु नका.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी आणि तो सण आनंदाने साजरा करावा अशा प्रकारची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा