Ration mofat yojana आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या नागरिकांचे मोफत राशन बंद होणार आहे याबाबत एक माहिती समोर आलेले आहेत नेमका आपल्याला काय करायचं हे राशन जर आपल्याला चालू ठेवायचा असेल तर कोणते कागदपत्र द्यावे लागतील त्याचप्रमाणे आपल्याला कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ज्यामुळे आपला मोफत राशन चालू राहील याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात.
Ration mofat yojana संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत तुम्हाला माहिती आहे की राशन कार्ड वर आपल्याला सर्वांना मोफत अन्नधान्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील नागरिकांना मोफत गहू आणि तांदूळ मिळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शंभर रुपयांमध्ये पाच वस्तू देण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केलेली आहे मला माहित आहे का राशन कार्ड हा सर्वात मोठा पुरावा आहे राशन कार्ड आपल्याला फक्त राशीन मिळत नाही तर तो आपल्याला सरकारी योजनेमध्ये देखील एक महत्त्वाचा आणि मोठा पुरावा आहे म्हणून ही राशन कार्ड जर तुम्हाला चालू ठेवायचा असेल तुमचं राशन बंद पडू द्यायचं नसेल तर तुम्हाला आता लगेच हे काम करावे लागेल तर याविषयी आपण आजच संपूर्ण माहिती पाहणार आहोत .
Ration mofat yojana या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्यांचे ई-केवायसी केले नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही, असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे चालू ठेवायचा असेल, तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे
ई-केवायसीसाठी प्रत्येक शिधापत्रिकेतील पात्र लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉझ मशीनवर आपला अंगठ्याचा ठसा (थम्स) द्यावा.
ही प्रक्रिया साधी असून, दुकानातच ती पूर्ण करता येते. जर काही कारणास्तव अंगठ्याचा ठसा घेता येत नसेल, तर दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या आयरिस स्कॅनरद्वारे डोळ्यांचा स्कॅन करूनही ई-केवायसी करता येते. या दोन्ही पर्यायांमुळे लाभार्थ्यांना सोयीचे पर्याय उपलब्ध आहेत.
ज्यांना हे दोन्ही पर्याय शक्य होत नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने घरबसल्या ई-केवायसीची सोयही उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये ‘मेरा ई-केवायसी’ हे अॅप डाउनलोड करावे लागेल.
या अॅपद्वारे लाभार्थी घरी बसूनच आपले ई-केवायसी करू शकतात. मात्र, यासाठी एक अट आहे – लाभार्थ्याच्या आधार कार्डशी त्यांचा मोबाइल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे. जर मोबाइल नंबर जोडलेला नसेल, तर ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आधारशी मोबाइल नंबर लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.
शासनाने याशिवाय क्यूआर कोडचा पर्यायही दिला आहे, ज्याचा वापर करूनही ही प्रक्रिया करता येते. तरीही काही अडचणी आल्या किंवा लाभार्थ्यांना या प्रक्रियेत मदत हवी असल्यास, त्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराशी किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राशन कार्डधारकांना लवकरात लवकर ekyc करणे गरजेचे आहे तुम्ही जर ही ekyc केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही केवायसी करा त्यामुळे तुमचा राशन कार्ड बंद होणार नाही आणि तुम्हाला मोफत राशन मिळणार आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Send link to fill form