RATION CARD RULE आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांचे मोठी बातमी समोर येत आहे या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे सरकारने मोठे निर्णय घेतलेला आहे कोणत्या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार कशामुळे होणार याबाबत आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत.
RATION CARD RULE संपूर्ण माहिती
राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे आपल्या सर्वांना माहिती आधार कार्ड नंतर सर्वच आपला मोठा पुरावा म्हणजे रेशन कार्ड असतो रेशन कार्ड आपल्याला मोफत अन्नधान्य योजना या अंतर्गत गहू तांदूळ हे मोफत मिळत असतात त्याचप्रमाणे इतर सर्व वस्तू देखील आपल्याला रेशन कार्ड वर मिळत असतात त्याचप्रमाणे आपल्याला याचा उपयोग सरकार योजनेत देखील करता येतो इतर काही ठिकाणी देखील आपल्याला रेशन कार्डचा मोठा उपयोग करता येतो आधार कार्ड फक्त आपला ओळखीचा पुरावा असला तरी रेशन कार्ड आपल्याला एक प्रकारे आधार देतो आणि गरिबांना सर्वात मोठा फायदा मिळवून देतो सर्व गरिबांचा आधार असलेला रेशन कार्ड आहे आता हे रेशन कार्ड काही नागरिकांचे रद्द होणार आहे कशामुळे रद्द होणार आणि आपल्याला लगेच काय करावे लागेल जेणेकरून आपल्या रेशन कार्ड रद्द होणार नाही बघूया संपूर्ण माहिती.
RATION CARD RULE राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोधमोहीम १ एप्रिलपासून सुरू झाली असून, ती एक महिना राबवली जाणार आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी याबाबतचा एक आदेश काढला. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत. दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार आहे.
रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील कार्डाची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत, ते स्पष्ट होईल. वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असेल. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. पुरावा सादर न केल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील, एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाईल.
शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, अशांकडे पिवळी/केशरी रेशन कार्ड असेल, तर ती तत्काळ अपात्र ठरविली जाईल आणि त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाईल. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थीच्या यादीतून वगळले जाणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन या प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा