Ration card free sadi आज आपण पाहणार की राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे रेशन कार्ड वर महिलांना आता मोफत साडी मिळणार आहे याबाबत तथा कोणत्या महिलांना साडी मिळणार कोणत्या जिल्ह्यात साडी मिळणार आहे मोफत नेमकं त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल या संपूर्ण विषयाची आपण आज माहिती पाहणार आहोत
Ration card free sadi संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळे योजना राबवत असतात जसं की तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं की महाराष्ट्रात याआधी देखील माझी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळतात तुम्हाला माहित आहे का आजचा रेशन कार्ड वर देखील महिलांना मोफत साड्या मिळणार आहेत नेमक्या कोणत्या महिलांना या साड्या मिळणार आहेत आणि कशामुळे मिळणार आहेत कोणत्या योजनेअंतर्गत मिळणारे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत
Ration card free sadi राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना साड्याचे गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सरकारी गोदामात होळीपूर्वीच साड्या दाखल झाल्या. त्यानंतर मार्चमध्ये साड्यांचे वाटपही सुरू झाले.
परंतु होळी आटोपून एप्रिल महिना अर्धा संपल्यानंतर सुद्धा ११ एप्रिल पर्यंत एकूण पात्र लाभार्थी ४५ हजार ६६४ पैकी केवळ २५ हजार ४०० लाभार्थी महिलांनाच साड्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर २० हजार २६४ लाभार्थी महिलांना अद्यापही साड्यांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे साड्यांचे वाटप कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसून येते.
राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनच्या साड्या वाटप करण्याचे जाहीर केले होते. गेल्यावर्षीही ही योजना राबवण्यात आली होती. यावर्षीही होळी सणानिमित्त साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना स्वस्त धान्य दुकानांमधून एक साडी मोफत देण्यात येत आहे.
कार्डधारकांना साड्यांचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात फेब्रुवारीच्या शेवटी साड्या दाखल झाल्या. परंतु साड्यांचे वाटप मार्चमध्ये सुरू झाले. परंतु होळी १३ मार्च रोजी व धुलीवंदन १४ मार्च रोजी आटोपल्यानंतरही अद्याप २० हजार लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप झाले नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना साड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
लाभार्थ्यांना लाभाची प्रतीक्षा
योजनेअंतर्ग साड्यांचे वितरण २६ जानेवारी ते होळी दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळविण्यात आले होते. त्यानुसार महामंडळाकडून राज्यातील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा करण्यात आला. परंतु साड्यांचे वाटप मात्र उशीराने सुरू झाल्याने अद्याप पूर्ण वाटप होणे बाकी आहे.
जिल्ह्यात ४५ हजारांवर लाभार्थी
अंत्योदय गटातील ४५ हजारांवर महिला लाभार्थी साड्यांसाठी पात्र आहेत. त्यातील अकोला तालुक्यात ६७१०, अकोला शहर २०२९, अकोट ६७१४, बाळापूर ५५८९, बार्शीटाकळी ७२३५, मूर्तिजापूर ६१८१, पातूर ५०९७, तेल्हारा तालुक्यात लाभार्थी संख्या ६०९८ आहे.
५५.६२ टक्केच वाटप
अंत्योदय गटातील ५५.६२ टक्के महिलांनाच साड्यांचे वाटप झाले आहे. त्यात अकोला शहरात ४४.९१ टक्के, अकोला ग्रामीण ८०, अकोट ३८, बाळापूर ९३.६३, बार्शीटाकळी ६५.३६, मूर्तिजापूर २६.०८, पातूर ७४.५४, तेल्हारा ४४.०३ टक्के असे जिल्ह्यात ५५.६२ टक्केच साड्यांचे वाटप झाले आहे.
अशी आहे साडी वाटप स्थिती
तालुका फेब्रुवारी मार्च एप्रिल आतापर्यंत
अकोला ८७ ३९१० २४
अकोला शहर ०६ ८२२ ८०
अकोट १५ २६५२ ०१
बाळापूर ११ ४४१२ ०४
बार्शीटाकळी ४२ ३८८४ ३६४
मूर्तिजापूर १२ २०९२ २७
पातूर ०८ ३९२८ ०५
तेल्हारा १७ २९९६ ०१
एकूण १९८ २४६९६ ५०६
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या महिलांना रेशन कार्डवर साडी मोफत मिळणार आहे याबाबत आपण माहिती मिळालेली आहेत आपल्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा