Ration card ekyc process आज आपण पाहणार आहोत की घरबसल्या आपल्याला राशन कार्ड ई केवायसी कशी करता येईल या संदर्भातली सर्व माहिती पाहिजे आहे यासाठी काय प्रोसिजर असेल काय कागदपत्रे लागतील आणि आपल्याला नेमकं काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात
Ration card ekyc process पूर्ण माहिती
Ration card ekyc process सर्वसामान्यांना अन्नधान्य देणारा एकच कार्ड आहे ते म्हणजे राशन कार्ड या राशन कार्ड चा उपयोग करून भरपूर गरीब गोरगरीब अन्नधान्य त्यांना भेटत असतं अल्प दरात भेटत असतं त्यानंतर कोरोना काळापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तांदूळ आणि गहू हे मोफत केलेले आहेत या सर्वांचा लाभ घेऊन आपलं सामाजिक जीवन गोरगरीब लोक हे राशन कार्ड वापरून जगत असतात
आता याच राशन कार्ड वर मोफत धान्य तुम्हाला कधी मिळणार तर तुमच्या राशन कार्ड चे तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल ही केवायसी याचा अर्थ की तुमच्या राशन कार्ड वर जी काही नाव आहेत त्या सर्व नावांचे तुम्हाला आधार कार्ड असेल ते ऑनलाईन तुम्हाला अपडेट करणे गरजेचे आहे यामुळे सर्व पारदर्शकता समोर येत असते
देशभरातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबांना स्वस्त दरात अन्न धान्य पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे शिधापत्रिका (Ration Card) असणे आवश्यक आहे.
पण, शिधापत्रिका धारकांसाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शिधापत्रिका धारकांनी येत्या 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य मिळणार नाही.
रेशन कार्ड ची ई-केवायसी करणे का गरजेचे आहे?
ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक शिधापत्रिका धारकाला त्याच्या ओळखपत्राशी जोडण्यासाठी करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक लाभ हा योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे का याची खात्री केली जाणार आहे. शिधापत्रिका धारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असेल किंवा नवीन सदस्य जोडायचा असेल तर ई-केवायसीच्या मदतीने ती माहिती अपडेट करता येते.
रेशन कार्ड ई-केवायसी कशी तपासावी?
ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरता येईल:
मेरा राशन ॲप डाऊनलोड करा: सर्वांत अगोदर Google Play Store वर जाऊन ‘Mera Ration’ ॲपडाऊनलोड करा.
ॲप मध्ये माहिती भरा: ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
आधार सिडिंग तपासा: माहिती सबमिट केल्यानंतर ‘आधार सिडिंग’ पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे ‘Yes’ किंवा ‘No’ असे ऑप्शन दिसतील.
Yes: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण आहे.
No: याचा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.
कशी करावी रेशन कार्ड ची e-kyc?
ज्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्या सदस्याची ई-केवायसी करण्यासाठी खालीलप्रमाणे पद्धत वापरा:
राज्य खाद्य पुरवठा विभागाच्या वेबसाइटला भेट द्या:
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा: तिथे तुमच्या शिधापत्रिका क्रमांकासह संबंधित सदस्याचा आधार क्रमांक जोडावा लागेल.
माहिती जमा करा: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेची ई-केवायसी अपडेट होईल आणि तुम्हाला लाभ मिळणे चालू राहील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की घरबसल्या आपल्याला राशन कार्ड केवायसी कशी करता येईल याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा