WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

QR CODE SCANNER UPDATE 2025 खरा आणि खोटा QR CODE कसं ओळखायचे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

QR CODE SCANNER UPDATE 2025 आज आपण पाहणार आहोत की खरा आणि खोटा क्यूआर कोड कसा ओळखायचा याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत या लेखनामध्ये आज तुम्ही बघत असाल डिजिटल पेमेंट मध्ये प्रत्येक ठिकाणी आता ऑनलाइन पेमेंट आहे या ठिकाणी QR कोड दिलेले असतात एक कक्र कोड कसे खरे आणि खोटे ओळखायचे या पण बघुयात

QR CODE SCANNER UPDATE 2025 पूर्ण माहिती

QR CODE SCANNER UPDATE 2025 आज भारतात अंतरिम बजेट जाहीर झालेला आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन प्रणालीवर आणखीन भर दिलेला आहे देशभरात राज्यात ऑनलाइन प्रणाली जगभरात चालू आहे प्रत्येक व्यवहार ऑनलाइन होत आहे पण यामध्ये काही असुरक्षितता देखील येत आहे त्यातच आपण बघणार आहोत की ऑनलाईन व्यवहारासाठी काही ठिकाणी यूपीआय पेमेंटचा वापर केला जातो यामध्ये QR CODE SCANNER चा वापर केला जातो आता हे खरे की खोटे हे कसे ओळखायचे कुठल्या गोष्टी ओळखायच्या त्यामुळे आपला व्यवहार सुरळीत होईल याची संपूर्ण माहिती आपण बघूया

QR Code : या आधुनिक युगात ऑनलाईन बँकिंग सिस्टम,डिजिटल पेमेंट सिस्टम, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम Digital Online Payments System.मोठ्या प्रमाणात वापरात आला आहे.छोटे छोटे व्यवसायापासून मोठ्या उद्योगांपर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी अर्थातच पैशांच्या घेवाणदेवांसाठी डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड QR Code वापरले जातात.

Quick Response Codes अगदी ऑटो रिक्षा ते मोठ्या व्यवसाय, उद्योगाकडून ही QR code वापरण्याची पद्धत आता सामान्य झाली आहे. विविध ऑनलाईन साइट्स वरून विविध वस्तूंची,सामान खरेदी करण्यासाठी,किंवा भाजीपाला फलफ्रुट, कपडे खरेदी करण्यासाठी आणि खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंट साठी क्यू आर कोड वापरले जात आहे.

दररोजच्या आर्थिक कामकाजात पेमेंटसाठी QR Code चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ठगबाज अर्थातच स्कॅमर आणि सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांद्वारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुद्धा बनावटी QR कोड चा वापर करण्यात येत आहे.

डिजिटल पेमेंट करण्यासाठी क्यू आर कोड वापरत असाल तर निश्चित सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. यासाठी डिजिटल पेमेंट करताना वापरात येणारा क्यूआर कोड हा खरा आहे किंवा खोटा आहे? ते कसा ओळखावा? हे ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

काय असतो QR कोड?.
QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड आहे. हे डिजिटल पेमेंट सोबतच विविध वस्तू, product ओळखण्यासाठी वापरात आणला जातो. हे QR Code खूप जलद गतीने काम करते.असून हे सर्व एका बॉक्समध्ये घडते. या बॉक्समध्ये url आणि मोबाईल नंबर लपवलेला असतो. अशात, कोड स्कॅन करताच, ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याची माहिती तुम्हाला तात्काळ मिळते.

डिजिटल पेमेंट दरम्यान क्यूआर कोड संदर्भात मध्य प्रदेशात धक्कादायक अशी घटना घडलेली आहे.यात सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी ठगबाजांकडून किंवा Sccamers द्वारे QR codes वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता डिजिटल ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी क्यूआर कोड व्हेरिफाय करणे हे महत्त्वाचे आहे.

जर कोणी या संदर्भात निष्काळजी करत असेल तर बनावट क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणारे स्कॅमर्स अशा व्यक्तीस आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढू शकते.

असे राहा QR Code फसवणुकीपासून सावध.
नुकतेच मध्य प्रदेशात उघड झालेल्या घटनेनुसार अनेक पेट्रोल पंपांसह विविध दुकानांचे बनावट क्युआर कोड बनविण्यात आले,असून मूळ दुकानांच्या QR कोड मध्ये बनावट पद्धतीने बदल करण्यात आले आहे.

यानंतर जो कोणी या QR Code चा स्कॅन करून पेमेंट देण्यासाठी वापर करते ती रक्कम थेट संबंधित व्यवसाय दुकानदाराकडे न जाता ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होऊन ही रक्कम थेट स्केमर्सच्या खात्यात पोहचून जाते.

उल्लेखनीय म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या या नवीन पद्धतीमध्ये विविध वस्तूंची खरेदी करणाऱ्या आणि त्यासाठी पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची माहिती सुद्धा हे QR code Scammers चोरतात.अशा स्थितीमध्ये ऑनलाईन पेमेंट करताना नागरिकांना काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

असा ओळखा QR Code खरा आहे की खोटा?
उल्लेखनीय म्हणजे डिजिटल पेमेंट साठी आपण विविध ठिकाणी जे क्यूआर कोड वापरतो,ते बहुतांश एक सारखेच दिसतात. या परिस्थितीमध्ये ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंट करताना समोर असलेले QR CODE हे खरे आहे किंवा खोटे आहे हे ओळखणे आवश्यक आहे.अशा बनावट Code पासून सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे.

यासाठी साउंड बॉक्स चा वापर करावा लागतो जर क्यू आर कोड वापरत आर्थिक व्यवहार करताना खात्यात पैसे पोहोचले असतील तर याची माहिती हे साउंड बॉक्स मधून मिळते. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने डिजिटल पेमेंट पर्याय वापरताना आपल्या दुकानात क्यूआर कोड चा फलक लावताना यासोबत आपल्या मोबाईल किंवा इतर पेमेंट उपकरण हे साउंड बॉक्स सोबत जोडणे आवश्यक आहे.

क्यूआर कोड डिजिटल पेमेंट सहित भाग आहे डिजिटल पेमेंट करून आपण सर्व व्यवहार सुरक्षित आणि सुरळीत करू शकतो यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष दिल्या पाहिजेत याचाच अभ्यास आपण या लेखनात करत आहोत आज प्रत्येक ठिकाणी छोटा उद्योगपती असेल नाहीतर मोठा हा व्यवहार ऑनलाइन केला जातो यात आपले कुठल्याही प्रकारचे असुरक्षित व्यवहार होऊ नये यासाठी काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे

Sound box मुळे समोरील ग्राहकांनी किंवा आर कोड चा वापर होताच पेमेंट केल्यावर दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा झाले तर याचा व्हॉइस मेसेज तो साउंड बॉक्स देतो,जर पैसे जमा होत नसेल,आणि कोणी स्कॅमर्स कडून क्यूआर कोड हॅक झालाअसेल, किंवा त्याने बनावट पद्धतीने हा क्यूआर कोड वापरात आणला असेल,तर पैसे जमा होत नसल्याने साऊंड बॉक्स मध्येही पैसे जमा झाल्याचा आवाज येणार नाही. त्यामुळे या संदर्भात तात्काळ समोरील कारवाई करणे सोपे असते.

क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करताना व्यवहार करण्यापूर्वी संबंधित दुकान मालकाकडून किंवा ज्या व्यक्तीकडून पेमेंट करत आहात, त्याच्याकडून किंवा QR Code वर दाखविलेले नाव पडताळून पाहावे, या परिस्थितीत, किंवा आर कोडच्या खऱ्या मालकाचे नाव कळणे सोपे असते.

जर कोणत्याही किंवा कोड बद्दल थोडीही शंका असेल तर सर्वप्रथम तो क्यूआर कोड गुगल लेन्स {Google Lens app} वर स्कॅन करावा,यामुळे तात्काळ कळते की, वापरात येत असलेला हा क्यू आर कोड कुठे रि-डायरेक्ट करीत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की Qr कोड हा कसा ओळखायचा खरा की खोटा ची पूर्ण माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment