WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new पोस्टाच्या या योजनेत 5 लाख गुंतवा 15 लाख मिळतील पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new आज आपण पाहणार की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण पाच लाख गुंतवले तर आपल्याला 15 लाख रुपये मिळणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असतील त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील नेमकं या योजनेचे काय नाव आहे याचीच आपण माहिती घेणार आहोत

Post scheme new संपूर्ण माहिती


राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर गुंतवणूक की मध्ये जर तुम्हाला रस असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील पैशांची गुंतवणूक करत असतो काही लोक जमीन घेतात सोने घेतात चांदी घेतात तर काही लोक शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात काही लोक म्युच्युअल फंड मध्ये लावतात या सर्व गोष्टी करत असताना पण आणखीन पोस्टाच्या काही योजना आहेत या योजनेत जर तुम्ही पैसे लावले मला चांगला मोबदला मिळणार आहे तर याच्या बद्दल आपण माहिती सविस्तर घेऊयात

Post scheme new जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, पण तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. या एफडीच्या माध्यमातून तुम्ही तुमची गुंतवणूक ३ पटीनं सहज वाढवू शकता.

पोस्ट ऑफिस एफडी योजना १, २, ३ आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी चालवल्या जातात. रक्कम तिप्पट करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. इन्कम टॅक्स अॅक्ट ८० सी अंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट्सही

५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी ही एफडी वाढवावी लागते. हे एक्सटेन्शन तुम्हाला सलग २ वेळा करावं लागेल म्हणजेच तुम्हाला ही एफडी १५ वर्षे चालवावी लागेल. जर तुम्ही या एफडीमध्ये ५ लाख रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानं तुम्हाला ५ वर्षात या रकमेवर २,२४,९७४ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल.

पण जर तुम्ही या योजनेला ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली तर १० वर्षात तुम्हाला फक्त व्याज म्हणून ५,५१,१७५ रुपये मिळतील आणि १० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम १०,५१,१७५ रुपये होईल. ते मॅच्युअर होण्यापूर्वी आपल्याला ते आणखी एकदा वाढवावं लागेल.

१५ व्या वर्षी तुम्हाला ५ लाखांच्या गुंतवणुकीवर फक्त व्याज म्हणून १०,२४,१४९ रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला १५,२४,१४९ रुपये मिळतील. अशा प्रकारे तुमची जमा झालेली रक्कम तिप्पट करून परत केली जाईल.

१ वर्षाच्या पोस्ट ऑफिस एफडीला मॅच्युरिटीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत, मॅच्युरिटी पीरियडच्या १२ महिन्यांच्या आत २ वर्षांच्या एफडीला आणि मॅच्युरिटी पीरियडच्या १८ महिन्यांच्या आत ३ आणि ५ वर्षांच्या एफडीला मुदतवाढ दिली जाऊ शकते. याशिवाय खातं उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता. मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीसाठी लागू असेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये आपण पैसे लावले तर आपल्याला चांगले मोबदला मिळणारे याची माहिती आपण घेतली आहे येणाऱ्या प्रत्येक अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment