Post Office Scheme 2l025 आज आपण पाहणार आहोत ही पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये आपण एक लाख रुपये गुंतवले तर आपल्याला याचा जास्त मोबदला मिळेल आणि आपल्याला किती फायदा होईल यासाठी तुम्हाला काय करायचंय किती पैसे मिळतील कुठे गुंतवायचे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Post Office Scheme 2025 पूर्ण माहिती
माणूस आपल्या जीवनामध्ये पैसा कमवून त्याचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असतो कारण त्याचा मोबदला त्याला मिळत असतो गुंतवणूक जर आपण योग्य ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी केली तर आपल्याला काही वर्षांनी त्याचा योग्य असा फायदा होत असतो आणि काहीतरी आपले मोठे काम होत असते या संदर्भात आपण पाहणार आहोत की पोस्टाचे एक योजना आहे यामध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपल्याला कशाप्रकारे याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये आपण जर पैसे गुंतवले तर यामध्ये आपल्याला सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतातील सर्वात सुरक्षित अशी व्यवहार हे पोस्ट ऑफिस मध्ये गेले जातात त्यामुळे येथे आपल्या लावलेल्या पैशांचा कुठलाही धोका हा नसतो आणि व्यवस्थित ठरविक वेळेमध्ये जो काही व्याजदर असेल तो आपल्याला भेटतो त्यामुळे सर्वच सुरक्षित असा पैसा आपला राहत असतो
यामुळे आज आपण पोस्ट ऑफिस च्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर एक दोन तीन आणि पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार याचीच आज आपण माहिती पाहणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिसची एफडी योजना?
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेला टाईम डिपॉझिट योजना असे नाव देण्यात आले आहे. काही लोक याला टर्म डिपॉझिट योजना असेही म्हणतात आणि याचे स्वरूप अगदीच बँकेच्या एफडी योजनेप्रमाणे आहे.
बँकेच्या फिक्स डिपॉझिट प्रमाणे या योजनेचे स्वरूप असल्याने याला पोस्टाची एफडी योजना किंवा टीडी योजना म्हणून ओळखल जात अन आज आपण पोस्टाच्या याच एफडी योजनेची किंवा टीडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. पोस्टाची टीडी योजना ही एक, दोन, तीन आणि पाच वर्षांची आहे.
पोस्टाची आपण जी योजना बघितली या एफडी योजनेमध्ये किंवा टीडी योजनेमध्ये जर तुम्ही पैसे पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला मोबदला मिळत आहे या योजनेत अंतर्गत एक दोन तीन आणि पाच वर्षाच्या आहेत तुम्ही पाहिला आहे तर व्याजदर देखील चांगला आहे आणि यात तुम्ही चांगले गुंतवणूक करू शकता
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कालावधीनुसार वेगवेगळ्या व्याजदराने परतावा दिला जातोय. एक वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून 6.9% दराने, दोन वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून सात टक्के दराने, तीन वर्षांच्या टीडी योजनेत पोस्ट ऑफिस कडून 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या टीडी योजनेत पोस्टाकडून 7.50% दराने परतावा दिला जात आहे.
एक लाख गुंतवले तर किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर म्हणजेच एका वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख सात हजार 81 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 7 हजार 81 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला सात टक्के दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच दोन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 14 हजार 888 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 14 हजार 888 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला 7.10% दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 23 हजार 508 रुपये मिळणार आहेत यामध्ये 23 हजार 508 रुपये हे गुंतवणूकदाराला मिळालेले व्याज राहणार आहे.
पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत एक लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदाराला 7.50% दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 44 हजार 995 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदाराला 44,995 रुपये रिटर्न म्हणून मिळतील.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण एक लाख रुपये गुंतवले तर आपल्याला कसा मोबदला मिळणार आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा