Post office best scheme आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये महिलांना दोन लाख मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असतील निकष काय असतील योजनेचे नाव काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Post office best scheme पूर्ण माहिती
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्यामुळे स्त्री पुरुष समानता यावी आणि राज्यातील देशातील स्त्रियांना देखील पुरुषांप्रमाणे दर्जा मिळावा आणि त्या आर्थिक रित्या सक्षम व्हावेत यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत आत्ताच एक योजना आहे पोस्टाची महिला सन्मान योजना अतर्गत तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळेल याचीच विश्लेषित माहिती आपण पाहूयात.
योजना भारत सरकार महिलांना वित्तीय दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राबवत असतात. त्यातील अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Savings Certificate). या योजनेतून महिलांना कमी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळतो.
महिलांसाठी फायदेशीर योजना –
या योजनेची सुरुवात सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी झाली. ही योजना विशेष करून महिलांना आर्थिक सुरक्षा आणि बचतीसाठी उत्तेजन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. महिलांना या योजनेमध्ये आकर्षक व्याज दराने गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यामध्ये, 7.5% वार्षिक व्याज दिले जाते, जे तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाते. त्यामुळे महिलांना जास्त नफा मिळवण्याची चांगली संधी मिळते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची वैशिष्ट्येः
- या योजनेअंतर्गत, महिलांना 1,000 रुपयांपासून ते 2,00,000 रुपयांपर्यंत पैसे गुंतवता येतात.
- या योजनेत, तिमाही चक्रवाढ 7.5% व्याजदराचे आकर्षक आणि निश्चित व्याज दिले जाते.
- या योजनेत, आंशिक पैसे काढण्याचा पर्याय आहे.
- या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
- हे खाते पोस्ट ऑफिस आणि नोंदणीकृत बँकांमध्ये सहजपणे उघडता येते.
कर सवलतीचा लाभ –
महिलांना किमान 1000 रुपये जमा करण्याची आवश्यकता असते, तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. या योजनेत महिला स्वतःसाठी तसेच त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठीही गुंतवणूक करू शकतात. तसेच , पती आपल्या पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेची एक आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, महिलांना या योजनेत गुंतवणूक करताना कर सवलतीचा लाभ मिळतो. ही योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे महिलांना सहजपणे बचत आणि गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात.
महिला सन्मान बचत पत्र योजना –
व्याज दर – 7.5% (तिमाही आधारावर)
गुंतवणुकीची किमान रक्कम – 1000 रु
गुंतवणुकीची जास्तीत जास्त रक्कम – २ लाख रु
वर्षाची मुदत – 2 वर्षे
कर लाभ – आयकर कायदा 80-सी अंतर्गत सवलत
व्याजावर कर – लागू (टीडीएस कापला जातो)
जर सरकारी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केली तर दोन वर्षानंतर या रक्कमेवर 32, 044 हजारांचे व्याज मिळेल. तर एकूण 2,32,044 रुपये रिटर्न मिळेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा उद्देशः
- महिलांना आर्थिकदृष्या स्वावलंबी बनवणे.
- महिलांना पैसे वाचवण्यासाठी आणि स्वतःसाठी आर्थिक स्वावलंबन निर्माण करण्यासाठी पाठिंबा देणे
अशाप्रकारे आपण महिलांसाठी कोणती योजना होती याची पूर्ण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा