WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC marathi answer key 2025 बारावी मराठी बोर्डाचा पेपर होताच बोर्डाकडून अचानक मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC marathi answer key 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यात मराठीचा पेपर हा बोर्डाचा झालेला आहे यामध्ये कशाप्रकारे बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

HSC marathi answer key 2025 पूर्ण माहिती.


राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या जवळपास सुरू झालेले आहेत बारावीचा मराठी इंग्रजी हिंदी या विषयांचे पेपर झालेले आहेत यानंतर दहावीचे पेपर हे 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत परंतु बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी प्रकरण आढळत आहेत जवळपास या कॉपी प्रकरणासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले परंतु त्याचा काय फरसा प्रभाव झालेला दिसत नाही यामुळे बोर्डाने आता आणखीन सशक्त मोठा निर्णय घेतलेला आहे

राज्यामध्ये महामंडळातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये बारावीचा बोर्डाचा मराठीचा पेपर देखील आज झाला या मराठीचा पेपरांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे काही अभिप्राय येत आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर काही माहिती येत आहे यानुसार मराठीचे पेपरांमध्ये पण काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत त्यामुळे आता बोर्डाने कठोर आणि सर्व कडक निर्णय घेण्याची ठरवल आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे

मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले

बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.

यावर्षी बारावीत किती विद्यार्थी आहेत

राज्यात 12 वी परीक्षेसाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 9 विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे, कुठे दडपणात तर कुठे उत्साहात 12 वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात 42 ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक 26 ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये, जालन्यातली काही केंद्रावर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत.

बारावीच्या पेपरात किती ठिकाणी कॉपी प्रकरण झाले

12 वीच्या (HSC) पहिल्याच पेपर दिवशी 42 ठिकाणी कॉपी (Copy) केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रांवर याठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

कॉपी मुक्त परीक्षेची अंमलबजावणी

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.

विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार

सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही त्यांनी सांगितले.
.
कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर

संवेदनशील परीक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावीचा मराठी बोर्डाचा पेपर होताच बोर्डाकडून आणखीन मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे तरी सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment