Pink riksha yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना कशाप्रकारे ही पिंक रिक्षा हा मिळणार आहे त्यासाठी अर्ज काय करायचं कुठे करायचा ऑफलाईन करायचा पात्रता काय असेल या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत
Pink riksha yojana 2025 पूर्ण माहिती
Pink riksha yojana 2025 लाडकी बहिण योजनेला भरघोस यश मिळाल्यानंतर आता महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा’च्या योजनेसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे, सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अर्थसंकल्पात महिला व बालविकास विभागाअंतर्गत ‘पिंक ई-रिक्षा’ योजना राज्य शासनाने सुरू केली. अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर १० जिल्ह्यांत ती सुरू आहे.
रिक्षा चालवणे हा स्वयंरोजगाराचा भाग आहे. राज्यातील महिलांना आर्थिक परिस्थिती मुळे रिक्षा खरेदी करता येत नाही. “पिंक ई-रिक्षा” योजना राबवून महिलांचे सक्षमीकरण (Women) होऊन महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील व उंच शिखरावर पोचतील, या धोरणात्मक उद्देशाने राज्य सरकारकडून ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी होणार आहेत
पिंक ई-रिक्षा” चा लाभ घेतल्यानंतर त्या स्वतः सक्षम होणार आहेत व त्या महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कोणाच्याही दैनंदिन खर्चावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. ही योजना महिलांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच सुरक्षिततेसाठी आणि गुलाबी ई-रिक्षातून प्रवास करणे अशा धोरणात्मक उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आमलात आणण्यात आली आहे
महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या
या योजनेबाबत संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केल्या. प्राप्त अर्जापैकी पाच हजार पात्र महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या की, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत असून, आजतागायत तीन हजार पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विभागाने या पथकाच्या माध्यमातून केले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठीची कार्यवाही करण्यासंदर्भातही यावेळी अदिती तटकरे यांनी सूचना दिल्या.
योजनेसाठीची पात्रता काय असेल
1)पिंक ई-रिक्षा या अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
२)पिंक ई-रिक्षा या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल.
३)पिंक ई-रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय २१ वर्षे ते ४० वर्षांदरम्मान असणे आवश्यक आहे.
योजनेचे स्वरूप, अनुदान कसे मिळणार
१)योजनेमध्ये पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा एजन्सीची माहिती दिली जाईल.
२)ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांच्या (GST, Ragistartion, Road Tax) समावेश असेल.
३)नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बैंक, खासगी बँक इत्यादीकडून ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
४)राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल.
५)योजनेची लाभार्थी महिला / मुली यांच्यावर १० टक्के आर्थिक भार असेल.
६)कर्जाची परतफेड ५ वर्षांची (६०) महिन्यांची असेल.
७)योजनेत महिलांना ५ वर्षाचा विमा करून दिला जाईल तसेच वाहन परवाना, प्रशिक्षण व बॅच बिल्ला दिला जाणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती काय असेल
१)योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
२)महिला लाभार्थ्याने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा
३)महिला लाभार्थी कर्जबाजारी नसावी.
४)कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील.
अर्ज कोठे आणि कसा करावा
पिंक रिक्षा योजनेच्या अटी पात्रता तुम्ही पाहिल्या असतील आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर संबंधित महानगरपालिका मध्ये महिला बाल विकास मंत्रालय किंवा तुमच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती किंवा ज्या ठिकाणी महिला बाल विकास केंद्र असेल त्या ठिकाणी भेट द्यावी आणि पूर्ण माहिती घ्यावी.
तर अशा प्रकारे आपण पाहिले की राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत पिंक रिक्षा कसा मिळणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा