WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan card update 2025 आज पासून पॅनकार्ड मध्ये 5मोठे बदल तुम्हाला होणार फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan card update 2025 आज आपण पाहणार आहोत की पॅन कार्ड मध्ये कोणते बदल झालेले आहेत यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठे अर्ज करायचा आहे पॅन कार्ड आपल्याला नवीन मिळणार का हे संपूर्ण विषयाची पाहूयात

Pan card update 2025 पूर्ण माहिती


पॅन कार्ड हा देशातील नागरिकांचा एक मोठा मोठा पुरावा आहे या पुराव्याच्या आधारे तुम्ही सर्व आर्थिक व्यवहार करत असतात ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये आधार कार्ड ला महत्व आहे त्याच ठिकाणी आर्थिक कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला पॅन कार्ड हे गरजेचं असतं पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचे बँकेचे व्यवहार तुमच्या योजना तुमची आर्थिक व्यवहार तुमचे कुठले लोनचे व्यवहार हे सर्व तुमच्या परमनंट अकाउंट नंबर वरून होत असतं त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचा आर्थिक पुरावा मानला जातो यामध्ये आता काही बदल झालेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

पॅन कार्ड ला आता राज्य सरकार त्याचप्रमाणे केंद्र सरकार हा एक मोठा पुरावा मानत आहे यामध्ये काही महत्त्वाचा बदल झालेला आहे आणि पॅन कार्ड आता अपडेट करण्यात आलेला आहे त्यामुळे नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड २.० लॉन्च करण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला भरपूर काही फायदा मिळणार आहेत या पॅन कार्ड २.० मध्ये तुम्हाला क्यूआर कोड मिळणार आहेत या क्यूआर कोडच्या आधारे तुमची सर्व माहिती एक स्कॅनर तुमची माहिती मिळणार आहे त्यामुळे संपर्क देखील नाही त्याचप्रमाणे सर्व असुरक्षित व्यवहार देखील बंद होतील आणि डुप्लिकेट काही गोष्टी होतात त्या देखील बंद होतील त्यामुळे सुरक्षितता वाढेल

PAN 2.0 म्हणजे काय?
सरकारने PAN 2.0 प्रकल्प सुरू केला आहे, जो पॅन कार्ड प्रणाली अधिक सुधारण्यासाठी आणि डिजिटल तंत्रज्ञानासह अद्ययावत करण्यासाठी आहे. या नव्या प्रणालीमुळे कर भरणे आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल. भारतात 78 कोटीहून अधिक पॅन कार्ड्स जारी करण्यात आले असून यातील 98% वैयक्तिक करदात्यांसाठी आहेत. नवीन प्रणालीमुळे प्राप्तिकर विभागाच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.

PAN 2.0 मध्ये काय नवीन बदल आहेत?
QR कोड प्रणाली: नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होतील. QR कोड स्कॅन करून त्वरित माहिती मिळवता येईल, यामुळे कागदपत्रांची पडताळणी वेगाने होईल.

सुरक्षा सुधारणा: डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पॅन डेटा अधिक सुरक्षित होणार आहे. पॅन कार्डसाठी वॉलेट प्रणाली लागू केली जाणार आहे, त्यामुळे कार्डधारकाची माहिती पूर्वीपेक्षा अधिक संरक्षित राहील.

एकत्रित कर सेवा: पॅन आणि TAN (Tax Deduction and Collection Account Number) सेवा एकत्र आणली जाणार आहे, ज्यामुळे करदात्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ होईल. यामुळे कर भरणे, गुंतवणुकीचे व्यवहार आणि कर प्रणालीशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि वेग वाढेल.

पेपरलेस प्रक्रिया: या नव्या प्रणालीमुळे पेपरवर्क कमी होईल आणि वेळेची बचत होईल. कर भरण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी केली जाणार आहे.

जुने पॅन कार्ड काय करायचे

तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळणार. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीपासून आहे. त्यांना नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणताही फॉर्म भरण्याची देखील गरज नाही. नवं पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड हे ऑटो अपडेट होणार.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पॅन कार्ड मध्ये कोणते महत्त्वाचे बदल झालेले आहे त्याची संपूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment