WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New birth certificate online apply जन्म दाखला मोबाईलवर मिनिटात काढा पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New birth certificate online apply आज आपण पाहणार आहोत जन्म दाखला हा मोबाईलवर कशा प्रकारे करता येईल अर्ज कसा करायचा ऑनलाइन की ऑफलाइन कोठे करायचा यासाठी कागदपत्र कुठली लागतील त्याचे पात्रता निकष काय असेल या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत.

New birth certificate online apply पूर्ण माहिती


माणसाचे जन्माचे दाखला हा भरभरच महत्वाच ज्याप्रमाणे भारतामध्ये आधार कार्डल जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आता जन्म दाखलेला देखील आहे कारण या जन्मदाखलेच्या आधारे तुम्हाला शाळेत ऍडमिशन भेटतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या शिक्षण पूर्ण करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला वयाच्या दाखला काढण्यासाठी देखील जन्म दाखला लागतो आणि भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे काही ठिकाणी तुम्हाला कुठले कागदपत्र शेतजमिनीचे नावावर करायचे असतील तरी तुम्हाला जन्मदाखलालाग लागत असतो

भारत सरकारने सर्व राज्यांमध्ये जन्म प्रमाणपत्र (जन्मचा दाखला) बनवणे बंधनकारक केले आहे. कारण जन्म दाखला हा अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्त्राद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या जन्माशी संबंधित पुरावा देऊ शकते. तसेच हे कागदपत्र मुलांसाठी सर्वात महत्वाचे आहे, कारण जन्म प्रमाणपत्राचा वापर मुलांच्या शाळेत नोंदणी करण्यासाठी, आधार कार्ड बनवण्यासाठी,इतर दुरुस्ती करण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी केला जातो. त्यामुळे जर एखाद्या मुलाचा जन्म दाखला रुग्णालयातून बनवला गेला नाही, तर या संदर्भात जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यासाठी सरकारने ऑफिशियल वेब पोर्टल सुरू केले आहे.

इथून तुम्ही जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. पण अनेक लोकांना मोबाईल च्या साहाय्याने जन्म दाखला कसा बनवायचा हे माहित नाही. पण मित्रांनो, जन्म प्रमाणपत्र बनवण्याची प्रोसेस या लेखात टप्प्याटप्प्याने दिली आहे, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सोप्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत, जी खाली दिली गेली आहेत.

मोबाईल वरून जन्म दाखला ऑनलाईन कसा बनवायचा? New birth certificate online apply

जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा आणि crsorgi.gov.in टाइप करून सर्च करा. किंवा येथे दिलेल्या अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते थेट वेबसाइट उघडू शकता.

ऑफिशियल वेबसाइट उघडल्यानंतर, होम पेजवरील जनरल पब्लिक साइनअप ऑप्शन वर क्लिक करा.

जनरल पब्लिक साइनअपच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर, साइन-अप फॉर्म ओपन होईल. त्यात दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक भरा आणि कॅप्चा कोड टाका आणि रजिस्टर बटणावर क्लिक करा.

यानंतर, तुमच्या ईमेलद्वारे यूजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल.

आता यूजर id आणि पासवर्ड टाका आणि कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन करण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा.

लॉग इन केल्यानंतर, एक पेज उघडेल. यामध्ये Birth च्या पर्यायावर क्लिक करून Add Birth Registration या पर्यायावर क्लिक करा.

याच्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, आईचे नाव, वडिलांचे नाव इत्यादी माहिती टाका. आणि सेव्ह बटणावर क्लिक करा.

यानंतर, डॉक्युमेंटची फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करा आणि खालील सेव्ह बटणावर क्लिक करा.

सेव्ह केल्यानंतर, तुम्ही भरलेल्या अर्जाचे Preview उघडेल,म्हणजे जन्म नोंदणी फॉर्म उघडेल.

आता त्यात टाकलेली सर्व माहिती तपासून घ्या आणि खालील सबमिट बटणावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन अर्जाची पावती मिळेल.

त्याची प्रिंट काढून ठेवा, आणि तुमच्या ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये जमा करून तुम्ही ते जारी करू शकता.
अशा प्रकारे घरबसल्या मोबाईलवरून जन्म दाखला ऑनलाईन काढता येईल.

घरबसल्या जन्माचा दाखल कसा काढायचा?

जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, पहिल्यांदा तुमच्या मोबाइल किंवा कॉमपयूटऱ् ऑफिशियल वेबसाइट crsorgi.gov.in ओपन करा आणि लॉग इन करा, लॉग इन केल्यानंतर, दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून तुम्ही घरी बसून जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

भारतामध्ये जन्म प्रमाणपत्र म्हणजे काय?

जन्म प्रमाणपत्र हा भारतातील सर्व लोकांसाठी एक महत्वाचे कागदपत्र आहे जे अधिकार्यांद्वारे जारी केला जातो आणि वयाचा पुरावा म्हणून काम करतो, जो त्यांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी सादर केला जाऊ शकतो. 1969 च्या कायद्यानुसार ते अनिवार्य करण्यात आले आहे.

जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला) काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

दवाखण्याची पावती
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड
मोबाईल नंबर
मुलाच्या पालकाचे आधार कार्ड

जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी कोणती अधिकृत वेबसाइट आहे?

जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अधिकृत वेबसाइट crsorgi.gov.in ही आहे. या वेबसाइटद्वारे तुम्ही जन्म प्रमाणपत्र ऑनलाइनकाढू शकता.

जन्म प्रमाणपत्र ऑफलाइन कसे काढायचे ?
जन्म दाखला ऑफलाइन काढण्यासाठी, खालील पायऱ्यांचे पालन करा:
ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जा
फॉर्म घ्या
फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा
आवश्यक कागदपत्रे जोडा
फॉर्म सबमिट करा.

वरील लेखनात आपण जन्म दाखला हा ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बघितला आहे की कशाप्रकारे करता येतो तर आमच्या सर्व अपेक्षा ते whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment