WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Neet exam update 2025 नीट विद्यार्थ्यांची चिंता वाढली सरकारचा अचानक मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Neet exam update 2025 आज आपण पाहणार आहोत की देशभरातील नीट विद्यार्थी ज्या आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे कारण अचानक सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे आणि विद्यार्थ्यांसाठी का आवश्यक आहे याचेच माहिती आपण घेणार आहोत

Neet exam update 2025 पूर्ण माहिती


देशभरातील विद्यार्थी हे मेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात जात असतात तर यामध्ये आता मेडिकल परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नीट परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे जर राज्यात आपण मेडिकल प्रवेश घेत असतात तर आपल्याला ही सीईटी कंपल्सरी असते परंतु आता नीट परीक्षा संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयात आता विद्यार्थी पालकांसाठी देखील हा महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षेचा काल इंग्रजी पेपर झालेला आहे त्यातच आता देशभरातील जी नीट परीक्षा घेणारी यंत्र नाही त्यांनी महत्त्वाचे अपडेट दिले आहे आणि सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे यावर्षी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र हे आवश्यक करण्यात आलेला आहे

सर्वात मोठा निर्णय घेतलेला

यंदाच्या नीट परीक्षेसाठी अर्ज करताना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना केंद्रीय जातीचा दाखला आवश्यक केला आहे.

जातीचा दाखला नसला तर

ज्या विद्यार्थ्यांकडे हा दाखला नसेल त्यांना संबंधित विभागाकडे अर्ज करून त्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करायची आहे. मात्र, केंद्रीय दाखल्याची मुदत एक वर्षाची असल्याने सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीय कोट्यातून प्रवेशावेळी पुन्हा केंद्रीय दाखला काढावा लागणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळले आहेत.

अर्ज करताना दाखला नसेल तर वैद्यकीय प्रवेश घेताना सदर दाखला हजर करू असे प्रतिज्ञापत्र अपलोड करण्याची संधी गतवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली होती. यंदाही तशी संधी देण्याची आवश्यकता होती. आधारकार्ड अपडेट करण्याविषयी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्व नोटीस काढली होती. मात्र, केंद्रीय दाखल्यासंबंधी कोणतीही पूर्वसूचना एजन्सीने दिलेली नाही. असे असताना ऐनवेळेस हा दाखला आवश्यक केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

सध्या देशभरात बारावीची परीक्षा सुरू असल्याने केंद्रीय जातीचा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाणार आहे. या दाखल्याचा उपयोग परीक्षेपुरता अर्ज करण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नव्याने पुन्हा दाखला काढावा लागेल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केंद्रीय जातीच्या दाखल्याऐवजी सेल्फ डिक्लरेशन फॉर्म अपलोड करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे

या तारखेपर्यंत अर्ज करता येणार.

नीटसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मार्चपर्यंत अर्जाची मुदत आहे. या काळात काढलेल्या केंद्रीय जातीच्या दाखल्याची मुदत ३१ मार्च २०२५पर्यंतच असेल. मात्र, केंद्रीय कोट्यातून वैद्यकीय प्रवेश घेताना १ एप्रिल २०२५ नंतरचाच दाखला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे नीटच्या अर्जासाठी यावर्षी काढलेल्या केंद्रीय दाखल्याचा उपयोग ऑल इंडिया कोटासाठीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी होणार नाही. प्रवेश अर्जासोबत केंद्रीय दाखला आवश्यक करण्याचे एनटीएचे प्रयोजन काय? असा सवाल विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित होत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिला की नीट विद्यार्थ्यांचे चिंता का वाढलेले आहे याच विषयाची संपूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment