WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करू नका तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यांमध्ये बारावीचे पेपर सुरू झालेले आहेत दहावीचे पेपर जवळपास 21 फेब्रुवारीपासून आहेत तर आता बारावीचा पेपर इंग्रजीचा झाला यामध्ये आता भरपूर ठिकाणी कॉपी प्रकरण आढळलेले आहेत तर कोणत्या विद्यार्थ्यांवर किती विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल झालेला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC board 2025 पूर्ण माहिती

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्यभरात आता सुरू झालेल्या आहेत यामध्ये आता कॉफी करण्याचा सुळसुळाट काही ठिकाणी पाहण्यात आलेला आहे यामुळे आता राज्य सरकारने प्रशासन त्याचप्रमाणे महाराष्ट्र बोर्ड सतर्क झालेला आहे यात आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या प्रकरणात आपलं लक्ष घातलेलं आहे या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यासमोर आलेले आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत

राज्यात बारावी साठी एवढे विद्यार्थी

राज्यात 12 वी परीक्षेसाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 9 विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे, कुठे दडपणात तर कुठे उत्साहात 12 वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात 42 ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक 26 ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये, जालन्यातली काही केंद्रावर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.

राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून स्वत: शिक्षण राज्यमंत्र्यांनी देखील आज बुलढाण्यातली एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली.

यावेळी, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, 12 वीच्या (HSC) पहिल्याच पेपर दिवशी 42 ठिकाणी कॉपी (Copy) केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रांवर याठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले.

जालन्यातली एक विद्यार्थी रेस्टीकेट

12 वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात विविध केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातल्या दोन परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. येथील, एका ठिकाणी शाळेच्या कंपाउंडवर चढून कॉप्या पुरवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे चक्क शाळेच्या छतावर चढून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे काम करत होते.

संबंधित प्रकार भरारी पथकाला लक्षात आल्यानंतर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातला एका विद्यार्थ्यावर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली आहे. तर, इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला या भागात काही केंद्रावरती हेच दृश्य पाहायला मिळाले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील कै. रेखाजी नाईक आश्रम शाळेवरील परीक्षा केंद्रावर आज बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला वैभव केशवराव कदम या विद्यार्थ्याने त्याच्या ऐवजी दुसरा परीक्षार्थी बसवला त्याने पेपरही दिला. याबाबत शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी त्याठिकाणी तपासणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर ससाणे यांनी केंद्र प्रमुख यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून केंद्र प्रमुख अंकुश भोसले यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात वैभव केशवराव कदम याच्या विरोधात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ मॉल प्रॅक्टिस एक्ट युनिवर्सिटी, बोर्ड अँड ऑदर स्पेसिसाईट एक्झामिनेशन ए अॅक्ट 07 नुसार गुन्हा दाखल केला.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे कॉपी करू नका अभ्यास करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment