Mofat shilae machine आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील नेमका अर्ज ऑनलाईन करायचा किंवा ऑफलाईन करायचा आहे त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवश्यक नियम आणि अटी काय आहेत आणि कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल या संपूर्ण विषयाची माहिती बघुयात
Mofat shilae machine संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांच्या सक्षमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सातत्याने काही ना काही योजना सुरू करत असते जसं की महाराष्ट्रात तुम्ही पाहत असताना महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना त्यानंतर माझी लाडकी लेक योजना या अंतर्गत राज्यातील मुलींना देखील याचा फायदा होतो त्याचप्रमाणे राज्यात मुलींच्या मोफत शिक्षणासाठी देखील योजना आहेत केंद्र सरकारमध्ये देखील भरपूर काही योजना आहेत आणि याच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता मोफत शिलाई मशीन मिळणार आहे या शिलाई मशीन चा उपयोग करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकतात आणि महिलांच्या सक्षमी करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच सतर्क असतं आता तुम्हाला ही जी मोफत शिलाई मशीन मिळणार आहे ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणार आहे आता याबद्दल आपण माहिती घेऊयात की नेमका आपल्याला अर्ज कसा करायचा आहे
Mofat shilae machine मोफत शिलाई मशीन योजना 2025मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना रोजगार मिळून त्यांना स्वहक्काने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पाठबळ देते, महिलांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोलाची साथ सरकार देत आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
महिलांना आपण पात्र आहोत की नाहीत हे बघून तुम्हाला हवेचे डॉक्युमेंट सबमिट करून अर्ज प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या CSC सेंटरला भेट देणे गरजेचे आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे?
देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना फ्री शिलाई मशीन वाटप करून त्यांना या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महिलांना आत्मनिर्भवण बनवण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. यातून महिला आपल्या पायावर उभा राहून कुटुंबाची सक्षम पणे जबाबदारी पेलु शकतील.
गरीब महिलांचे जीवनमान सुधारणे.
शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तिला खाजगी किंवा बँकेतून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये यासाठी ही योजना काम करत आहे.
या योजनेच्या माध्यमातून रोजगार देऊन महिलांचे उत्पन्न वाढवणे महिलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तिला आत्मनिर्भर करणे.
फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे
1. मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा नक्कीच आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना होणार आहे.
2. महिला शिलाई काम करून आपल्या घरची परिस्थिती सुधारू शकतात.
3. तसेच महिलांना आत्मनिर्भर बनण्यामध्ये सुद्धा या योजनेचा फायदा होईल.
4. जर एखाद्या महिलेकडे खरंच शिवणकाम करण्याचे कौशल्य असेल परंतु त्या महिलेकडे जर शिलाई मशीन घेण्यासाठी पैसे नसतील ,तर इतर कोणत्याही ठिकाणावरून कर्ज घेण्याची गरज त्या महिलेला पडणार नाही.
5. कारण या योजनेअंतर्गत ती महिला जर गरीब असेल तर नक्कीच तिला मोफत शिलाई मशीन मिळू शकेल.
6. तसेच महिलांकडे असलेल्या कला कौशल्याला अधिक वाव मिळेल
शिलाई मशीन योजनेचे नियम व अटी
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र मधील महिला पात्र असतील.
40 वयापेक्षा जास्त वय असनाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही.
इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिलेस याचा लाभ घेता येणार नाही.
कुटुंबात सरकारी नोकर असेल तर याचा लाभ मिळणार नाही.
फक्त महिलांचा याचा लाभ मिळेल, पुरूष वर्गाला घेता येणार नाही.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
1. आधार कार्ड: सरकारी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड अनिवार्य आहे.
2. पॅन कार्ड: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
3. बँक खाते विवरण: अनुदान थेट बँक खात्यात जमा होत असल्याने बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे.
4. पत्त्याचा पुरावा: राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल इत्यादींपैकी कोणतेही एक.
5. जात प्रमाणपत्र: महिलेचे जात प्रमाणपत्र.
6. बीपीएल कार्ड: दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा.
7. उत्पन्न प्रमाणपत्र: महिलेचे वार्षिक उत्पन्न २,००,००० रुपयांपेक्षा कमी असल्याचा पुरावा.
8. पासपोर्ट आकाराचा फोटो: अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो.
9. स्वाक्षरी: अर्जदाराची स्वाक्षरी.
मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा?
महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपल्याला ही मोफत शिलाई मशीन मिळत आहे तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट पीएम विश्वकर्मा या वेबसाईट वरती जाऊन आपल्या शिलाई मशीन साठी अर्ज करायचा आहे. शिलाई मशीन ऑफिशियल वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन कशी मिळणार आहे याबाबत आपण माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा