WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

minimum bank account बँक खात्यात कमीत कमी एवढे पैसे ठेवाअन्यथा खाते होणार बंद RBI चा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

minimum bank account आज आपण पाहणार आहोत की बँकेमध्ये कमीत कमी किती रक्कम असली पाहिजे आणि यासाठी आपल्याला काय करावे लागत नाही तर आपल्या अकाउंट बंद पडणार का आरबीआयचे काय नियम आहेत या संदर्भात आणि कोणत्या बँकेत किती रक्कम कमीत कमी ठेवावी याचीच माहिती आपण घेणार आहोत.

minimum bank account  पूर्ण माहिती

minimum bank account माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस हा पैसे कमवतो आणि पैसे कमवून तो सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे बँकेत पैसे ठेवत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का कमीत कमी पैसे हे किती आपल्या अकाउंट वर असले पाहिजे आहेत जर आपण तेवढे रक्कम जर आपल्या खात्यात ठेवली नाही तर आपल्या अकाउंट बंद पडते त्यामुळे आपण सर्वांनी याचीच माहिती या लेखनात घेणार आहोत की कुठल्या बँकेत आपल्याला किती पैसे कमीत कमी ठेवावे तसेच बंद पडलेले खाते चालू कसे करायचे याची पण माहिती आपण घेणार आहोत.

minimum bank account दरमहिना पगारावर उदरनिर्वाह करणारे बहुतेक लोक बँकांमध्ये साधारणपणे – बचत खाते (सेव्हिंग) आणि चालू (करंट) अकाउंट अशी दोन प्रकारची खाती उघडतात. बचत खातं उघडताना तुम्हाला किमान शिल्लकचा नियम पाळावा लागतो. बँकांची स्वतःची किमान शिल्लक मर्यादा वेगवेगळी असते. बहुतेक लोक बचत खात्यात किमान शिल्लक ठेवत नाहीत, पण खात्यात किमान शिल्लक राखणे फार महत्वाचे असते नाहीतर बँक तुमच्यावर दंडही आकारू शकते. परंतु एखाद्या व्यक्तीचे शून्य शिल्लक खाते असेल तर त्याला किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही

minimum bank account आजच्या डिजिटल युगात बँक खाते हे प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मग ते पगार असो, ऑनलाइन खरेदी असो किंवा विविध आर्थिक व्यवहार असोत, बँक खात्याशिवाय आपले दैनंदिन जीवन अडचणीत येऊ शकते.

मात्र, अनेकदा किमान शिल्लक रकमेच्या नियमांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, जे खातेदारांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.

किमान शिल्लक रकमेबाबत महत्त्वाचा निर्णय: minimum bank account

आरबीआयने नव्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, निष्क्रिय खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम नसल्यास बँका दंड आकारू शकणार नाहीत. विशेषतः जी खाती गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाहीत, अशा खात्यांसाठी हा नियम लागू होणार आहे. यामुळे अनेक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी अशा खात्यांवर बँका नियमितपणे दंड आकारत होत्या, ज्यामुळे खातेदारांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडत होता.

विद्यार्थ्यांनी सरकारी योजना यासाठी विशेष तरतूद

आरबीआयने एक महत्त्वाची तरतूद केली आहे, ज्यानुसार शिष्यवृत्ती किंवा विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची खाती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिली तरीही ती बंद केली जाणार नाहीत.

या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि इतर लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याची खात्री झाली आहे. बँकांना या खात्यांच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना खात्याच्या स्थितीबद्दल माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निष्क्रिय खाती पुनर्जीवित करण्याची सुलभ प्रक्रिया: नवीन नियमांनुसार, जर कोणत्याही व्यक्तीला त्याचे निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. पूर्वी बँका या प्रक्रियेसाठी विविध शुल्क आकारत होत्या.

आता ग्राहक सहज आणि विनामूल्य आपले जुने खाते पुन्हा दावा न केलेल्या ठेवींबाबत महत्त्वपूर्ण माहिती: मार्च 2024 पर्यंत बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींची एकूण रक्कम 42,272 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या रकमेमध्ये अशा पैशांचा समावेश आहे, जे अनेक वर्षांपासून विविध खात्यांमध्ये पडून आहेत आणि ज्यांचा कोणीही दावा केलेला नाही. आरबीआयने या रकमेच्या योग्य वापरासाठी एक विशेष फंड तयार केला आहे. बँकांना या रकमेचे हस्तांतरण या फंडात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बँकांच्या जबाबदाऱ्या काय आहेतः

नवीन नियमांनुसार बँकांना अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:
१. निष्क्रिय खात्यांच्या मालकांशी नियमित संपर्क साधणे
२. खात्याच्या स्थितीबद्दल ग्राहकांना अवगत करणे
३. पुनर्जीवित करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे ४. दावा न केलेल्या ठेवींची योग्य नोंद ठेवणे
५. ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे

ग्राहकांसाठी महत्त्वाचे मुद्दे
: १. जर तुमचे खाते निष्क्रिय असेल, तर आता कोणताही दंड न भरता ते पुन्हा सक्रिय करू शकता
२. किमान शिल्लक रकमेची अट आता निष्क्रिय खात्यांना लागू होणार नाही
३. सरकारी योजना किंवा शिष्यवृत्तीची खाती आपोआप बंद होणार नाहीत
४. खाते पुनर्जीवित करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
५. बँकेकडून कोणताही त्रास झाल्यास आरबीआयकडे तक्रार करू शकता

कोणत्या बँकेत किती रक्कम ठेवावी..minimum bank account

बँक बझारच्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बचत खाते असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत प्लस खाती असलेल्या ग्राहकांना ३,००० रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असून निमशहरी भागात असलेल्या SBI बँकेच्या शाखांमध्ये बचत खातेधारकांना २,००० तर ग्रामीण भागातील बचत खातेधारकांसाठी किमान १,००० रुपये शिल्लक खात्यात ठेवणे आवश्यक आहे.
तसेच एचडीएफसी बँकेच्या शहरी आणि मेट्रो ठिकाणी नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी १०,००० तर ग्रामीण आणि निमशहरी बँक शाखांमध्ये बचत खाती असलेल्या ग्राहकांनी अनुक्रमे ५,००० आणि २,५०० रुपयांची सरासरी मासिक शिल्लक राखली पाहिजे (किंवा किमान एक वर्ष आणि १ दिवसाच्या मुदत ठेवी).

येस बँकेच्या सेव्हिंग्ज ॲडव्हान्टेज खाती असलेल्या ग्राहकांसाठी १०,००० रुपये खात्यात ठेवले पाहिजे. तर एखाद्या ग्राहकाने किमान शिल्लक आवश्यकता राखली नाही, तर त्यांना दरमहा ५०० रुपयेपर्यंत नॉन मेंटेनन्स शुल्क आकारले जाईल.

मेट्रो आणि शहरी भागात असलेल्या शाखांमध्ये नियमित बचत खाती असलेल्या ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी सरासरी मासिक शिल्लक १०,००० रुपये, निमशहरी आणि ग्रामीण भागातील बचत खाती असलेल्या ग्राहकांनी दरमहा अनुक्रमे ५,००० आणि २,००० रुपये किमान शिल्लक राखली पाहिजे. याशिवाय ग्रामीण भागात नियमित बचत खाते असलेल्या ग्राहकांनी १,००० रुपये किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या एज सेव्हिंग्स खाती असलेल्या ग्राहकांनी किमान मासिक शिल्लक १०,००० रुपये राखणे आवश्यक असून ग्राहकांनी अट पूर्ण केली नाही तर बँक त्यांना ५०० रुपये पर्यंत मासिक नॉन-मेंटेनन्स शुल्क आकारले जाते. तसेच बँकेने ऑफर केलेल्या कोटक ८११ बचत खात्यात किमान शिल्लक आवश्यक नसून तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड माहितीसह कोटक महिंद्रा ८११ शून्य शिल्लक बचत खाते उघडू शकता.

तर अशाप्रकारे आपण वरील लेखनात पाहिलं की कोणत्या बँकेत किती मिनिमम रक्कम ठेवावी लागते आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या 9322515123नंबर वर संपर्क करा

Leave a Comment