Ladaki bahin yojana 2025 सरकारची नवीन अट
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे लाडकी बहीण योजनेत सरकारची नवीन अट आलेले आहे या नवीन अटीनुसार आता लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
राज्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर महिन्याला १५०० रुपये पाठवण्यात येतात. आता या योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलंय. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गतही केंद्र आणि राज्य सरकार पैसे देते. तर दुसरीकडे लाडक्या बहिणींनाही लाभ दिला जातोय. अशा वेळी दोन्ही ठिकाणचा लाभ घेता येणार नाही. दोन्ही पैकी एका योजनेचा लाभ महिलांना घेता येईल असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय.
Ladaki bahin yojana 2025 कृषिमंत्री काय म्हणाले
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, नमो महासन्मानमध्ये पैसे दिले जातात. लाडक्या बहिणींमध्येही लाभ दिला जात आहे. एका वेळी दोन ठिकाणी लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलांनी निर्णय घ्यायचा आहे. लाडकी बहिणमध्ये लाभ घ्यायचा की पंतप्रधान सन्मान निधीमध्ये घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे.
नियमाप्रमाणे दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं तो निर्णय महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा. हे त्यांनी ठरवायचं असल्याचंही कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं.
Ladaki bahin yojana 2025 लाडक्या बहिणीमुळे समस्या निर्माण झाल्या
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू लागल्यानं महिला शेती कामासाठी येत नाहीत, परिणामी मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्याच्या चर्चा होत आहेत. यावर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, सर्वच कामांसाठी लाडक्या बहिणी कशाला हव्यात, त्यांच्यावर का अवलंबून रहायचं असा सवालही त्यांनी विचारला.
Ladaki bahin yojana 2025 या योजनेमुळे महिला अपात्र होणार
नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तीन हफ्त्यात ६ हजार रुपये, आणि राज्य सरकारकडून ६ हजार रुपये असे एकत्रित १२ हजार रुपये मिळतात. तर राज्य सरकार लाडकी बहीण योजनेंतर्गत महिन्याला १५०० असे वर्षाला एकूण १८ हजार रुपये देतेय. आता या दोन्ही योजनांचा एखाद्या महिलेला लाभ होत असेल तर त्यापैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.
वरील लेखात आपण लाडक्या बहिणी कुठल्या अपत्र होणार आहेत याचीच माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा