Ladaki bahin yoajana today update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आणि कोणाला मिळणार नाहीयेत याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत लाडक्या बहिणींना सध्या दीड हजार रुपये मिळतात परंतु 2100रुपये कधी मिळणार आणि त्यासाठी काय पात्रता आहे हे आपण बघणार आहोत
Ladaki bahin yoajana today update पूर्ण माहिती
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा आत्ताच जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे फेब्रुवारीचा हप्ता हा 2100 रुपयाचा येणार का दीड हजार रुपयाचा येणार याचीच माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या लाडक्या बहिणींना 2100रुपये मिळणार नाहीत याची देखील आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी काय पात्रता असणार आहे काय निकष बदललेले आहेत का ते संपूर्ण माहिती बघूयात
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवीन वळण आले आहे. या योजनेंतर्गत जे लाभार्थी निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांच्याकडून दिलेले पैसे परत घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला असून, सरकार याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थींना दरमहा १,५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतात. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत सहा हप्ते लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात
लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे पाऊल
१)आर्थिक भार:
या योजनेवर होणारा खर्च इतर महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
२. पात्रता तपासणी: अनेक लाभार्थी योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
३. नियमांमधील स्पष्टता: नव्या सरकारने योजनेच्या अटी व शर्तींमध्ये अधिक स्पष्टता आणली असून, त्यानुसार पात्रता निश्चित केली जात आहे.
सरकारची भूमिका काय असेल
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की योजना सुरूच राहणार आहे. मात्र, अपात्र लाभार्थींच्या अर्जांची पुन्हा छाननी केली जाईल. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
१. योजना सुरू करताना लाभार्थींच्या पात्रतेबाबत स्पष्ट निकष होते.
२. नव्या सरकारने या निकषांमध्ये अधिक स्पष्टता आणली आहे.
३. अपात्र लाभार्थींकडून पैसे वसूल करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
या पाच गोष्टीमुळे लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे.
1)अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील, तर लाभ मिळणार नाही.
2) एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्या अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे. एखादा लाभार्थी ‘नमो शेतकरी’ योजनेचा फायदा घेत असेल, तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1500 रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाईल.
3)चारचाकी वाहनं असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. अशा महिला लाभ घेत असतील, तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.
4) आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे.
5) विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे.
6)नाव आणि आधार नंबर वेगवेगळा असणं, काहींनी दोनवेळा अर्ज केलेला आढळून आलं, काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यास होत्या, त्या आता दुसऱ्या राज्याच्या रहिवासी आहेत अशा महिलांचे अर्ज, काहींनी चुकीचं हमीपत्र जोडलेलं आहे अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आल्या आहेत.
7)काही महिला सरकारी नोकरीत लागल्यामुळे आमचा लाभ कमी करावा, अशी मागणी संबंधित महिलांनी स्वतःहून केली आहे. काही महिलांचं नोकरीत प्रमोशन झालंय, तर काहींना सरकारी नोकरी लागल्यामुळं लाभ नको असे आहे, असंही त्यांनी सांगितलं.
२१०० रुपये कधी मिळणार
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी एकनाथ शिंदे यांनी लाभार्थी बहिणी योजना जुलैमध्ये सुरू केली त्यावेळेस लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये मिळत होते आता 2100 रुपये कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्पष्ट केलेले आहे की 2100 रुपये हे मार्च मध्ये अर्थसंकल्प महाराष्ट्राचा जाहीर होणार आहे त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत.
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार कधी मिळणार कोणाला मिळणार याची माहिती घेतली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा