WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin yoajana january installment या लाडक्या बहिणींना संक्रातीचा हप्ता मिळणार ! पाहा यादीत तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin yoajana january installment
आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला लाडक्या बहिणींचा हप्ता जानेवारीचा कधी मिळणार कोणाला मिळणार कोणत्या महिला पात्र असणार आहे कोणत्या पात्र याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत उद्या संक्रात आहे त्यामुळे मी कधी मिळणार बघूयात.

Ladaki bahin yoajana january installment पूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सरकारने आता ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची लिस्ट काढण्यास सुरुवात केली आहे. (Ladki Bahin Yojana)

माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले Ladaki bahin yoajana january installment

केवळ विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले आहेत. नव्याने चौकशी झाल्यानंतर 60 लाखाहून अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद होतील असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं. मुंबई गोवा महामार्गाकडे केंद्र सरकारच जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ठेकेदारांचे हित होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असल्याचे विनायक राऊत म्हणाले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिल जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं आमचं सरकार आल्यास 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेत साधारणपणे अडीच कोटी महिलांना दमहा 1500 रुपये दिले जातात. महायुतीनं निवडणुकीच्या काळात महिलांना सरकार पुन्हा आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण करण्यासंर्भात अर्थसंकल्पात विचार होईल, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला अर्जदारांच्या अर्जाची पडताळणी पूर्णपणे जरी होणार नसली तरी तक्रार येईल त्यांच्याबाबत होईलं असं सांगण्यात आलं होतं. आता, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी स्वत : नावं काढून घ्यावीत असं म्हटलं आहे. अन्यथा नियमात न बसणाऱ्यांकडून दंडासह वसुली केली जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? Ladaki bahin yoajana january installment

एक अपिल लोकांना पाहिजे लोकांना, जे या नियमात बसत नाहीत त्यांनी स्वत:हून नावं काढा म्हणून सांगायला पाहिजे. जे पैसे दिले ते परत मागण्यात काही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये. याच्यापुढे लोकांना सांगावं नियमात बसत नाही त्यांनी स्वत:हून आपली नावं काढून घ्यावी. नाही पेक्षा मग त्यांना मात्र दंडासहीत वसुली करता येईल. मागचं जे झालं ते लाडक्या बहि‍णींना अर्पण करुन टाकू, असं छगन भुजबळ म्हणाले.

नाव काढून घेण्यासंदर्भातील प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह?

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली होती. राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्ष लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरुन घेण्यात आले होते. आता राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्या महिला लाभार्थी पात्र नाहीत त्यांनी योजनेतून स्वत:हून नाव काढूनं टाकावं असं म्हटलंय. मात्र, लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याची नेमकी प्रक्रिया काय याबाबतचं चित्र स्पष्ट नाही. त्यामुळं संभ्रमाचं वातावरण आहे.

या लाडक्या बहिणीं अपात्र होणार ..Ladaki bahin yoajana january installment

जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत सरकार मोठी अक्शन घेण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २५ टक्के महिलांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे पैसे वाचू शकतात. ९०० कोटी रुपये दर महिन्याला वाचू शकतात असं सांगितलं जात आहे. (Ladki Bahin Yojana Update)

इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचसोबत आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे, असं सांगितलं जात आहे.

याचसोबत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल २५ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा ९४ लाख महिला लाभार्थी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेत या महिलांना लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

वरील लेखनात आपण लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिला अपात्र होणार त्याचप्रमाणे कोणाला हप्ता मिळणार याची माहिती घेतलेली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment