Ladaki bahin may hafta आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता किती मिळणार आहे कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत कशामुळे मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत राज्यातील बहिणींसाठी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे तर बघुयात संपूर्ण माहिती
Ladaki bahin may hafta संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु तुम्हाला माहिती आहे का आता राज्यातील काही महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत नेमक्या कोणत्या कारणाने यांनाही पाचशे रुपये मिळणार आहेत आतापर्यंत एप्रिलचे महिन्याचे दहा हप्ते आपले जमा झालेले आहेत आता 11व्हा हफ्ता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे नेमकं कोणत्या कारणामुळे मिळणार आहे याविषयी आपण पूर्ण संपूर्ण माहिती पाहणार आहोत
Ladaki bahin may hafta लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट येत असतात. लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना मे महिन्यात फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.
या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु काही महिलांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत. इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच जर इतर योजनांमध्ये १५०० रुपयांपेक्षा कमी निधी मिळत असेल तर उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाते.
ज्या महिला नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा लाभ घेतात त्यांना ५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात.त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.
मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यंदाही तेव्हाच पैसे दिले जाण्याची शक्यता आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना कोणत्या पाचशे रुपये महिन्याला मिळणारे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा