Ladaki bahin january installment आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जानेवारीतील हप्ता कधी मिळणार त्याचप्रमाणे 2100रुपये त्यांच्या खात्यात कधी येणार याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Ladaki bahin january installment पूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरणाच्या टप्प्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थींच्या खात्यात ४५०० रुपये जमा केले जात आहेत. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा न झाल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबींची माहिती घेऊया.
माहाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.
जानेवारी चा हप्ता कधी मिळणारलाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारी रोजी या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं आहे.
संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत.”आदिती तटकरे म्हणाल्या की, “आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2 कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. थोड्याफार कमी होतील.”
जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार Ladaki bahin january installment
जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकरसंक्रांत म्हणजेच १४ जानेवारीपर्यंत दिला जाईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र, आता अजूनही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल, असं सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana)
महिलांना आतापर्यंत ९००० रुपये दिले गेले आहेत. दरम्यान, या महिन्याचा हप्ता येण्याआधी महिलांच्या अर्जाची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, फक्त तक्रारी आल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. जानेवारी महिन्याचे पहिले १५ दिवस उलटून गेले तरीही अजून पुढचा हप्ता आला नाही म्हणून महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे.(Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना स्वतः हून अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. जर तुम्ही अपात्र असाल तरीही तुम्हीही अर्ज माघारी घ्या. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?Ladaki bahin january installment
लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. या योजनेत मार्च महिन्यापासून महिलांना २१०० रुपये दिले जाऊ शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बँक खात्यात पैसे न येण्याची कारणे Ladaki bahin january installment
आधार लिंक नसणे:
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे
ज्या महिलांचे खाते आधारशी जोडलेले नाही, त्यांना तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
नजीकच्या बँक शाखेत जाऊन आधार लिंकिंगची प्रक्रिया करता येते
चुकीची बँक माहिती:
अर्जात भरलेली बँक खात्याची माहिती पुन्हा तपासून पहावी
खाते क्रमांक, IFSC कोड यांची पडताळणी करावी
चुकीची माहिती असल्यास योग्य माहितीसह अर्ज दुरुस्त करावा
वरील लेखनात आपण लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता कधी येणार याविषयी माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.