WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin apatra yadi 2025 या लाडक्या बहिणी अपात्र 8वा हप्ता मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin apatra yadi 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्यांना आठवा हक्क मिळणार नाही याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Ladaki bahin apatra yadi 2025 पूर्ण माहिती

राज्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आता अर्जंट छाननी सुरू आहे आणि काही लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील आता भरपूर महिला अपात्र झालेल्या आहेत तर राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात लाडक्या बहिणी आप्पाराव होणार आहेत कोणत्या बहिणींना आठवा हप्ता मिळणार नाही याची माहिती आपण बघुयात

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki bahin yojana) निकषात अद्याप एकही बदल केलेल नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे. तसेच, ज्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले, ते पैसे सरकार परत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडक्या बहि‍णींना मिळणार लाभ मिळतच राहणार असून ज्या बहि‍णींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

त्यानुसार, शासन स्तरावर आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रुीटीनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार, लातूर (Latur) जिल्ह्यातील 25 हजार लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद झाल्याची माहिती स्वत: महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लाकड्या बहि‍णींना योजनेतून दे धक्का करण्यात येत असल्याचे दिसून येते. 
राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता.

लातूर जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक महिलांना योजनेचा निधीही मिळाला. पण, दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 
लाडक्या बहि‍णींना महिन्यासाठी दीड हजार रुपये कधी खात्यामध्ये पडणार याची उत्सुकता सातत्याने असते. आतापर्यंत 7 महिन्यांचे दीड हजार प्रमाणे पैसेही खात्यावर जमा झाले आहेत. पण काही ठिकाणी अनियमिता आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड असे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

तर काही अर्जामध्ये कागदपत्रांची पूर्तताच झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 25 हजार 136 अर्ज हे रद्द करण्यात आल्याचे जिल्हा परिषद विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये खोटी कागदपत्रे सादर करणे, उत्पन्न जास्त असणे यासारख्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यातील सर्व जिल्ह्यात छाननी सुरू

राज्यातील सर्व जिल्ह्यात आता अर्जांची छाननी सुरू आहे आणि यामधून अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे की ज्या महिला इतर शासकीय कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना याच्यातून वगळण्यात येणार आहे आणि याचा जवळपास जो आकडा आहे 60लाख महिला राज्यातल्या अपात्र होणार आहेत.

लाडक्या बहिणींवर कारवाई होणार का

महाराष्ट्रातील राज्यातील लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे परंतु काहीही लाडक्या बहिणी या वेगळ्या पद्धतीने याचा लाभ घेत आहेत अशा अर्जांची छानस सुरू आहे यामध्ये ज्या लाडक्या वहिनी अपात्र होत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का अशा प्रकारचे माहिती आपल्यावर समोरीत आहे की त्यांच्यावर कारवाई होणार नाही बालविकास मंत्री यादी तटकरे यांनी दिली आहे

8 वा हफ्त जमा होणार की नाही?

लातूर जिल्ह्यात योजनेच्या प्रारंभी पहिल्या टप्प्यात 3 लाख 42 हजार 152 अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 50 हजार 67 अर्ज आले होते. एकूण 5 लाख 92 हजार प्राप्त झाले असताना दुसरीकडे छाननीचे काम सुरू होते. या छाननीमध्ये अर्ज रद्द करण्यात आले आहेत. कारवाईच्या भीतीने काहींनी योजनेचा निधी नको, असा पत्रव्यवहारही केला आहे. निवडणुकीनंतरही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली असली तरी नियमावर बोट ठेवत अंमलबजावणी होत असल्याने आता अनेकांच्या खात्यावर 8 वा हप्ता जमा होणार की नाही हे पहावे लागणार आहे. मात्र, सरकारच्या भूमिकेमुळे लाडक्या बहि‍णींच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून योजनेचा लाभ कुठपर्यंत मिळणार, आपण लाभार्थी राहणार की नाही, असे प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत आहेत.

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत याची पूर्ण माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा.

Leave a Comment