HSC Maths Answer key today आज आपण पाहणार आहोत की बारावी बोर्डाच्या गणिताच्या नंतर बोर्डाने अचानक मोठा निर्णय कोणता घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे आणि हा निर्णय किती महत्त्वपूर्ण आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत
HSC Maths Answer key today पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये अचानक बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आजच राज्यातील बारावी बोर्डाचा गणिताचा पेपर विज्ञान शाखेचा झाला आहे यानंतर बोर्डाने अचानक एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय का महत्वपूर्ण आहे हे बघुयात
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी गैरप्रकार होत आहे बारावी बोर्डाचा फिजिक्स पेपर हा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठला होता यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त झाला आहे दहावीच्या परीक्षा देखील सुरू आहेत दहावीचा मराठीचा पेपर पहिला झाला तो तीन ठिकाणी चार ठिकाणी फुटला आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांचा संताप आणखीन वाढला यामुळे आता बोर्डाने सतर्कतचा इशारा घेतलेला आहे
आज बोर्डाचा गणिताचा पेपर झाला
बारावी बोर्डाचा आज गणिताचा पेपर झालेला आहे गणिताचा पेपर हा अत्यंत महत्त्वाचा असतो हा पेपर देखील झाल्यानंतर काही परीक्षा केंद्राबाहेर गैरप्रकार सुरू होते त्यामुळे हुशार विद्यार्थी अभ्यास करून पेपर लिहितात परंतु हे जे मुल आहेत कॉफीच्या जीवावर पेपर लिहितात म्हणजेच आयत्या बिळात नागोबा अभ्यास न करता हे पेपर लिहून चांगले मार्क मिळतील आणि मुलं अभ्यास करणारे यांना कमी मार्क मिळू शकतात अशा प्रकारचा संताप पालकांनी व्यक्त केलेला आहे
बोर्डाने काय निर्णय घेतला
बारावी बोर्डाचा गणिताचा पेपर झाला आहे परीक्षा केंद्र व गैरप्रकार झाला यामुळे यामुळे आता बारावी बोर्डाचे कॉमर्सचे त्याचप्रमाणे विज्ञान शाखेचा बायोलॉजी हा पेपर बाकी आहेत त्यामुळे आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर आता सर मिसळ पद्धत राबवणार आहेत बैठके पथक भरारी पथक यांची संख्या वाढवणार परीक्षा केंद्र बाहेर ड्रोन कॅमेरे यांची संख्या वाढवणार आणि विशेष करून विशेष शिक्षकांची नेमणूक देखील करण्यात येणार आहे त्यामुळे असा गैरप्रकार घडणार नाही याची काळजी दक्षता आता बोर्ड येणार आहे
शरद गोसावी नेमकं काय म्हणाले?
पेपरफुटी या प्रकाराचं मी पूर्णपणे खंडन करतो.
शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना, संबंधित ज्या शाळेमध्ये पेपर फुटला असं दाखवलं जातंय, तिथे जे पेपर व्हायरल झाले आहेत. त्याचा आणि प्रश्नपत्रिकेचा काहीही एक संबंध नसल्याचं गोसावी यांनी सांगितलं. पुन्हा ते म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांनी मला ती पाने देखील पाठवले आहेत. त्या पानांचा आणि प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. त्याबद्दल अधिक माहिती तसेच रिपोर्ट आम्ही घेत आहोत, असं म्हणत गोसावी यांनी या प्रकाराचं खंडण आणि पेपर फुटला नसल्याचा दावा केलाय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना दहावी, बारावी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले.दहावी, बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. पण हे आदेश फक्त आदेशच राहिले गेले, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून यायला लागलीये.
काय म्हणाले शिक्षणमंत्री?
दरम्यान, पेपरफुटीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काही ठिकाणी कॉपी झाली. कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले, तशा चित्रफितही प्रसार माध्यमातून पुढे आल्या. त्याची निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे. यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली ते केंद्र रद्द करण्यात आले आहे. त्याच बरोबर यापूर्वी ज्या केंद्रावर कॉपी झाली आहे. त्या केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. कॉपी पुरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ते केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जाईल, असे दादा भुसे यांनी म्हटले
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात बोर्डाने काय निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा