Government schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे सरकारच्या कोणत्या योजना बंद होणार ?आहेत यामुळे नागरिकांना याचा फटका बसणार आहे नेमकं या योजना कोणत्या आहेत आणि कशामुळे बंद होणार ?आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
Government schemes 2025 पूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना सुरू केलेले आहेत यामध्ये आता काही योजना चा लाभ नागरिकांना मिळत आहे परंतु काही योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाहीये त्यामुळे आता या योजना बंद पडणार का अशा कोणत्या योजना आहेत तुम्ही देखील याचा फॉर्म भरलेला आहे का आणि या योजना नेमकं कोणतं कारण आहे की बंद पडणार ?आहे किंवा याचा लाभ पुढे भविष्यात मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत
Government schemes 2025विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, या दोन्ही योजना सध्या थांबल्या आहेत. सध्या नवीन लाभार्थींना अर्ज करता येत नाहीत आणि यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व लाभार्थींना योजनांचा लाभ देखील मिळालेला नाही. राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार ध्यानात घेऊन काही योजना गुंडाळल्या जातील
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणाऱ्या) भारतातील ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचे दर्शन अपेक्षित आहे. या योजनेचा शासन निर्णय १४ जुलै २०२४ रोजी निघाला आणि त्यानुसार प्रत्येक लाभार्थीस शासनाकडून ३० हजार रुपयांचा खर्च दिला जातो. मात्र, ज्यांचे वय सध्या ६५ ते ७० वर्षांपर्यंत झाले आहे, असे हजारो ज्येष्ठ नागरिक अजूनही तीर्थ दर्शनाच्या प्रतीक्षेतच आहेत.
दुसरीकडे ३१ डिसेंबर २०२३ रोजी ६५ वर्षे झालेल्या वृद्धांना चालणे, पाहणे आणि ऐकण्यासाठी उपकरणे घेता यावीत म्हणून तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय निघाला, लाखो वृद्धांनी अर्ज देखील केले. मात्र, त्या सर्वांना अजूनही सरकारकडून तीन हजार रुपये मिळाले नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
लाभार्थींना दोन्ही योजनांचा लवकरच मिळेल लाभ
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १४०० जणांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यापैकी ८०० जणांचे तीर्थ दर्शन झाले आहे. याशिवाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील काही लाभार्थींना प्रत्येकी तीन हजार रुपये मिळाले असून उर्वरित लाभार्थींनाही लवकरच तो निधी मिळेल, अशी आशा आहे.
– सुलोचना महाडीक, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही नावापुरतीच?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याचा निर्णय झाला. ही योजना १ जुलै २०२४पासून लागू करण्यात आली. दुसरीकडे लाडक्या बहिणींना (५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंब) एका वर्षात तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सरकारने जाहीर केली. त्यानुसार गॅस सिलिंडर खरेदी केल्यावर सरकारकडून त्या लाडक्या बहिणींना वर्षातील तीन सिलिंडरची रक्कम मिळणार आहे. मात्र, सध्या केंद्राच्या उज्ज्वला गॅस योजनेचेच अंशदान महिलांना मिळत असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ अनेकांना मिळालेला नाही, अशी माहिती गॅस वितरकांनी दिली.
अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रातील ज्या योजना आहेत या कोणत्या बंद होणार आहे याचीच आपण माहिती पाहिली आहे आपल्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा त्याचप्रमाणे नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा.