GOVERMENT LADIES SCHEME आज आपण करणार आहोत की महिलांसाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या योजनेमार्फत आपल्याला काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपणास घेणार आहोत तर राज्यातील महिलांसाठी खूपच महत्त्वाची
बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती.
GOVERMENT LADIES SCHEME संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असतात त्याच्यामध्ये आता महिलांसाठी जवळपास केंद्र सरकारच्या सहाय्य योजना आहेत या योजनेचा तुम्ही फायदा घेऊन चांगला उपयोग करून घेऊ शकता तर तुम्हाला या योजनेची माहिती आणि काय काय कागदपत्र लागतात याविषयी आपणास माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात महिलांसाठी तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बेडणे योजना माजी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत त्यांना चांगलाच निवडला मिळतो आता केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत त्या पाहू संपूर्ण माहिती
GOVERMENT LADIES SCHEME महिला म्हणजे शक्तीचे प्रतीक. त्यांच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. तरीही, आयुष्याच्या प्रवासात आपल्याला कधी ना कधी मदतीची गरज पडतेच. अशा वेळी, सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध योजना खूप उपयुक्त ठरू शकतात. जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत, या योजना महिलांना प्रत्येक टप्प्यावर साथ देतात.
एखाद्या चिमुकल्या जीवाला आई म्हणून या जगात आणण्यापासून ते बचत करून मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यापर्यंत, सरकारच्या कल्याणकारी योजना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. आम्ही तुम्हाला अशा ६ योजनांबद्दल माहिती देत आहोत, ज्या तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे, त्यांची लगेच नोंद करून घ्या.
1. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
देशातील गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २०१७ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना ५,००० रुपये दिले जातात, जे दोन हप्त्यांमध्ये मिळतात. ही आर्थिक मदत गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणानंतरच्या पोषणासाठी उपयुक्त ठरते.
2. सुकन्या समृद्धी योजना
ही योजना 2015 मध्ये मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सुरू केली. यात तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडून तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसे वाचवू शकता. यात तुम्ही दरमहा 250 रुपये जमा करू शकता आणि सरकार त्यावर चांगले व्याज देते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा 1,000 रुपये जमा केले, तर 21 वर्षांनंतर मुलीच्या खात्यात 5,54,612 रुपये जमा होऊ शकतात.
3. पीएम उज्ज्वला योजना
अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ गॅस मिळत नव्हता. चुलीच्या धुरामुळे महिलांना त्रास व्हायचा. ही समस्या दूर करण्यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेमुळे 10 कोटींपेक्षा जास्त महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे. त्यांना गॅस सिलेंडर पुन्हा भरण्यासाठीही (रिफिल) सवलतीच्या दरात (जवळपास 550 रुपये) मिळतो.
4. प्रधानमंत्री मुद्रा योजना
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरली आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या ६८ टक्क्यांहून अधिक लाभार्थी महिलाच आहेत. याअंतर्गत ५०,००० रुपयांपासून ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे, महिलांना व्याजात वेगळी सवलत देखील मिळते.
5. पीएम आवास योजना-ग्रामीण (PMAY-G)
देशभरातील बेघर किंवा कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) एक वरदान आहे. या योजनेत महिलांना प्राधान्य दिले जात असून, एकूण लाभार्थ्यांपैकी ७३ टक्के महिलाच आहेत. यामुळे महिलांच्या नावे पक्की घरे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
PM विश्वकर्मा योजना
ही योजना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते. या योजनेअंतर्गत बँकेकडून 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यामुळे महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या कोणत्या योजना ज्यामुळे महिलांना चांगला फायदा होईल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा