gharkul yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कशाप्रकारे घरकुल योजनेअंतर्गत घर मिळणारे यासाठी पात्रता काय असेल प्रोसेस काय असेल अर्ज कुठे करायचा ऑफलाईन करायचा किंवा ऑनलाईन याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
gharkul yojana 2025 पूर्ण माहिती
2025 अनेक नागरिकांना घरकुल योजना अंतर्गत घरकुल मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.२०२५ या वर्षामध्ये १३ लाख २९ हजार ६७८ घरांची घोषणा करण्यात आली आहे. पीएम आवास योजना अंतर्गत हि घरकुले मिळणार आहेत.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना हक्काचे घर नाही हे घर मिळविण्यासाठी तुम्हाला आता पीएम आवास योजनेची मदत मिळणार आहे.
पीएम आवास योजना अंतर्गत ज्यांना घरे नाहीत त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे शासनाच्या विविध योजना अंतर्गत घर योजनेचा लाभ मिळतो. शासनाच्या कोणकोणत्या घरकुल योजना आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
घरकुल योजना अंतर्गत या वर्षी मिळणार लाखों नागरिकांना घरे. Gharkul yojana 2025
चालू वर्षी सर्वसामान्य नागरिकांना लाखों घरे मिळणार असल्याची घोषणा केंद्रशासनाकडून करण्यात आल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर या अगोदरच जाहीर केले आहे.
पीएम आवास योजना अंतर्गत अनेक नागरिकांना घरकुल मिळत आहे व काही नागरिक वेटिंगलिस्टवर आहेत. ज्यांची नावे पीएम आवास योजनेत समाविष्ट आहेत त्यांनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायची आहेत.
घरकुल योजना ज्यांची नावे योजनेत नाहीत त्यांनी लक्ष द्यावे gharkul yojana 2025
ज्या नागरिकांचे नावे पीएम आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाहीत त्यांची नावे देखील घरकुल योजनेत समाविष्ट होणार आहेत.घरकुल योजनेचा नवीन सर्वे या वर्षी होणार आहे. ज्यावेळी घरकुल योजनेचा सर्वे होईल त्यावेळी योग्य ती माहिती दिल्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये येवू शकत आहेतः
पीएम आवास योजना हि दोन प्रकारे राबविली जाते. शहरी आणि ग्रामीण. ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते तथापि डोंगरी भागातील नागरिकांना १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते.घरकुल लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस असतो आहे
लाभार्थी निवड प्रक्रिया. gharkul yojana 2025
लाभार्थीची निवड प्राधान्य क्रमानुसार केली जाते. हा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे असतो.
१)बेघर लाभार्थी.
२)ज्याच्याकडे राहण्यासाठी १ खोली आहे असा लाभार्थी.
३)त्यानंतर ज्यांच्याकडे राहण्यासाठी २ खोल्या आहेत असे लाभार्थी आहेतः
वरील प्राधान्यक्रमानुसार लाभार्थीची निवड केली जाते आणि पीएम आवास योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.
विविध घरकुल योजनातून मिळतो आर्थिक लाभ
शासनाकडून घर बांधकाम करण्यासाठी केवळ पीएम आवास योजनाच नव्हे तर इतर विविध योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये जातीनुसार अनुदान दिले जाते. ज्या योजनांतून घर बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते त्या योजना खालीलप्रमाणे आहे.
१) रमाई आवास योजना.
२) शबरी आवास योजना.
३) यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
४) मोदी आवास घरकुल योजना.
इत्यादी ५ प्रकारच्या योजनेतून नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शिवाय लाभार्थ्याकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून जागा दिली जाते असे आहे
अशा प्रकारे आपण घरकुल योजनेविषयी पूर्ण माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.