WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul yojana 2025 जमीन नसलेल्य घरकुल मिळणार आनंदाची बातमी पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की घरकुल योजना संदर्भात एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहे आता घरकुल योजना ही प्रत्येकाला कशाप्रकारे मिळणार यासाठी कस काय करायचे कुठे अर्ज करायचा आहे ऑफलाइन किंवा ऑनलाईन या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे

Gharkul yojana 2025 पूर्ण माहिती

प्रत्येकाचे स्वप्न असते घर आणि दार असायला हवे कारण घर असले तर माणूस हा व्यवस्थित आपले जीवन आपल्या परिवारासोबत जगत असतो परंतु बऱ्याच लोकांना आपल्या आर्थिक अडचणीमुळे आपले घर बांधणे शक्य नसते त्यामुळे आता सरकार या सर्व धारकांना घरकुल देणार आहे सोबत ज्या लोकांना जमीन नसेल परंतु घरकुल मंजूर झालेला आहे अशांना देखील आता जमीन सरकार देणार आहे

बऱ्याच वेळेस घरकुल योजनेचा लाभ मिळतो परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. अशावेळी आपण घरकुल योजनेपासून वंचित राहतो कि काय अशी शंका मनात निर्माण होते.

परंतु आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण तुमचे नाव जर घरकुल यादीत आले असेल आणि तुम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर शासनाकडून तुम्हाला जागा मिळणार आहे.

केवळ जागाच नव्हे तर ज्या पात्र अर्जदारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल अशा अर्जदारांना घरकुल देतांना प्राधान्यक्रम देखील दिला जाणार आहे.या संदर्भातील निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबधित अधिकारी यांनी काल दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले

मागच्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलेला आहे की घरकुल योजनेमध्ये जर एखाद्या लाभार्थ्याचे नाव आले परंतु जर त्याच्याकडे जागा नसेल तर त्याला जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव देखील आता राज्य शासनाच्या कमिटीकडे पाठवण्यात आलेला आहे आणि याच्यावरचा निर्णय देखील मोठा होणार आहे त्यामुळे जमीन नसलेल्या धारकांसाठी देखील आनंदाची बातमी आहे

मंजूर घरकुलांची यादी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लागणार


अनेकदा आपले नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे किंवा नाही या संदर्भात लाभार्थीला संभ्रम निर्माण होतो. अशावेळी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागामध्ये आता यापुढे घरकुल योजनेच्या मंजूर याद्या लागणार आहे.लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करतांना अनुदान रकमेचा हफ्ता वेळेवर मिळेल जेणे करून घरकुल योजना अंतर्गत घराचे काम लवकरात लवकर होईल.

20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट

प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत.

या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.

बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित
अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.

घरकुल योजनेत होणारा भ्रष्टाचार थांबविणे गरजेचे


काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेच्या अनुदानाचा हफ्ता मिळविण्यासाठी लाभार्थीकडून लाच मागण्याची शक्यता असते. अशावेळी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता रीतसर तक्रार केल्यास लाभार्थीचे होणारे आर्थिक शोषण थांबू शकते.तर अशा पद्धतीने ज्या पात्र लाभार्ठींकडे घरबांधकाम करण्यासाठी जागा नाही त्यांना आता प्राधान्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे.यामुळे ज्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नाही अशा पात्र लाभार्थीसाठी नक्कीच हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की घरकुल योजनेत आपल्याला लाभ कसा मिळणार आहे यासाठी काय करावे लागणार आहे याची पूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

1 thought on “Gharkul yojana 2025 जमीन नसलेल्य घरकुल मिळणार आनंदाची बातमी पाहा पूर्ण प्रोसेस”

  1. घरकुल योजनेची सविस्तर माहिती विस्तारीत करावी.ही नम्र विनंती.

    Reply

Leave a Comment