dnyanjyoti scholarship 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांना 60000 रुपये कसे मिळणार आहेत त्यासाठी काय करायला लागणार अर्ज कुठे करायला लागणार पात्रता काय असणार अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत
dnyanjyoti scholarship
dnyanjyoti scholarship 2025 पूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्ञानज्योती शिष्यवृत्ती अर्थातच सावित्रीबाई फुले आधार योजना या अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना 60000 रुपये मिळणार आहे या ६० हजार रुपयांचा उपयोग करून विद्यार्थी आता चांगले शिक्षण घेऊ शकतात त्यांना सर्वात मोठा आधार मिळणार आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सरकार मार्फत जनजागृती सुरू आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आधार योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आर्थिक मदत मिळणार आहे
राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (Special Backward Class Students) उच्च शिक्षणासाठी अनेकदा अन्य जिल्ह्यांत जावे लागते. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी, याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
उच्च शिक्षणासाठी अन्य जिल्ह्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा निवास, जेवणाच्या खर्चाचा भार पालकांना सहन करावा लागतो. त्यामुळे इतर बहुजन कल्याण विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्वयंम आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वाधार या दोन योजनांच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले आधार योजना (dyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वर्षाला ६० हजारांचा लाभ मिळतो.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी, तुमच्या ब्लॉक किंवा जिल्ह्याच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जा.
कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून मिळवा.
फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेले सर्व आवश्यक तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा. तसेच फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
आता अर्ज सबमिट करा आणि तुम्हाला एक पावती मिळेल आणि ती तुमच्याकडे सुरक्षितपणे ठेवा.
आता तुमचा अर्ज पडताळणी अंतर्गत असेल आणि सर्वकाही बरोबर आढळल्यास तुमची पात्र उमेदवार म्हणून निवड केली जाईल आणि योजनेचा लाभ दिला जाईल.
अधिकृत वेबसाइट आहे: mahadbt.maharashtra.gov.in
अर्जासाठी पात्रता काय असेल
अर्ज भरणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा निवासी असवा व तो वसतिगृह प्रवेशास पात्र आहे, परंतू त्याला प्रवेश मिळाला नाही. प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शहरातील, जिल्ह्यातील तो रहिवासी नसावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला. अनाथ प्रवर्गासाठी महिला व बालकल्याण विभागाचे अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रवर्गासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ ते 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
१२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी, विद्यार्थ्याला किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक. महिलांसाठी ३० टक्के, दिव्यांग विद्यार्थ्यांना चार टक्के आरक्षण असून, किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये देण्यात येतात. त्यात भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार आणि निर्वाह भत्ता ८ हजार रुपये यांचा समावेश आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला
बँक खाते पासबुक
10वी आणि 12वी मार्कशीट
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
मोबाईल नंबर
गैर-स्थानिक निवासस्थानावरील भाडे आणि निवासाची पुष्टी करणारे नोटरीकृत शपथपत्र
प्रवेशाचा पुरावा (शाळा किंवा महाविद्यालय)
अनाथ श्रेणीसाठी अनाथ प्रमाणपत्र / अपंगत्वाच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र.
अधिवास प्रमाणपत्र
जातीचा दाखला
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फायदे
कमकुवत आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील ओबीसी विद्यार्थ्यांना रु. 60,000/- प्रति वर्ष या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना एकाच जिल्ह्यातील सुमारे 600 पात्र विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे .
ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल ते अभ्यास साहित्य खरेदी करू शकतील आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फायदा अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
डीबीटीचा वापर करून, पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
या प्रकारची शिष्यवृत्ती योजना वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यास मदत करेल.
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील विद्यार्थ्यांना 60000 पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा प्लेस्टोर वरून फाउंडेशनडेशन