Dhavi result link आज आपण पाहणार की उद्या दहावी बोर्डाचा निकाल आहे आणि तो कसा आणि कुठे पैसा त्याचप्रमाणे आपल्याला निकाल पाहण्यासाठी काय कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे निकाल कोणत्या लिंक वर पाहिजे कशाप्रकारे कोणत्या पद्धतीने या पूर्ण विषयाची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघणार आहोत.
Dhavi result link संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थी पालक दहावी बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा करत होते त्यातच आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे बोर्डाने निकाल जाहीर केलेला आहे आणि तो निकाल उद्या लागणार आहे दुपारी एक वाजता त्याचप्रमाणे निकाल कोठे आणि कसा पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना दहावी बारावी बोर्डाच्या निकाल कसा पाहिजे याची माहिती नसते तरी तुम्हाला आपण पूर्ण बघणार आहोत की कुठली वेबसाईट आणि कशाप्रकारे आपल्याला वेबसाईटवर क्लिक करून निकाल कसे बघता येईल बघूया संपूर्ण माहिती
Dhavi result link दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल (SSC Result 2025) लागणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन दहावीचा निकाल पाहता येणार आहे.राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळं विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर उद्या 10 वीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सर्व साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
दरम्यान, यावर्षी बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला होता. त्यामुळं आता सगळ्यांचे लक्ष 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळं पदवी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल. त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
कधी झाली होती परिक्ष
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता. दहवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात. निकाल कसा चेक करायचा यासंदर्भात डिटेल्स माहिती जाणून घेऊयात.
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा निकाल कसा आणि कुठे बघायचं कोणत्या लिंक वर याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा