WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance update 2555 कोटी पिक विमा मंजूर आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत कशाप्रकारे जमा होणार आहेत आणि आपल्याला काय करायचे याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत जवळपास 2555 कोटी पिक विमा मंजूर झालेला आहे आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकरच टाकण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचे ते बघुयात संपूर्ण माहिती.

Crop insurance update पूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर आहे राज्यातील शेतकरी हा सुखी समृद्ध तेव्हाच राहतो ज्यावेळेस त्याची शेती व्यवस्थित होत असते आणि शेती नीट होण्यासाठी तेव्हा पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतो हवामान जर चांगले राहिले तर शेतीत त्याला थोडासा मोबदला मिळतो आणि ते जर पिकाला भाव चांगला लागला नाही तरी त्याला तोटा भेटतो म्हणजे शेतकऱ्याचे पूर्णपणे हवामान आणि नशिबावर पूर्ण अवलंबून असतो यामध्ये पण त्याला वादळीवाऱ्याचा फटका बसला किंवा अवकाळी पाऊस बसला तर त्याला भरपूर नुकसान होतं त्यामुळे राज्य सरकार पिक विमा अनुदान अशा योजना त्यांना देत असतात आता मागच्या हंगामात जे पिक विमा साठी अर्ज मंजूर झालेले आहेत त्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत याची माहिती आपण आज घेणार आहोत.

Crop insurance update शेतकरी खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईची वाट पाहत होते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच शिवाय खरिप २०२२ पासून रखडेलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरिप आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ तसेच रब्बी २०२३-२४ आणि खरिप २०२४ मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या सर्व हंगामातील एकूण २ हजार ५५५ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील भरपाईची कोणत्याच प्रकारची भरपाई मिळालेली नव्हती. शिवाय खरिप हंगाम २०२२ आणि रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये ११० टक्क्यांपेक्षा अधिकची भरपाई देण्यासाठी राज्याकडे रक्कम शिल्लक होती. तसेच खरिप खरिप हंगाम २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील ११० टक्क्यांपेक्षा अधिक भरपाईची रक्कम आणि खरिप २०२४ मधील शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता आणि राज्य सरकारचा विमा हप्ता राज्य सरकारने दिलेला नव्हता. तसेच रब्बी हंगाम २०२४-२५ मधील शेतकरी हिस्स्याचा विमा हप्ता आणि राज्याचा विमा हप्ताही कंपन्यांना दिला नव्हता. त्यामुळे या सर्व हंगामात देय असलेली विमा भरपाईची रक्कम रखडली होती. ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलनेही केली.

राज्य सरकारने अखेर २०२२ पासून रखडलेल्या विमा भरपाईचा मुद्दा निकाली काढला. खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४, खरिप २०२४ तसेच रब्बी २०२४-२५ या सर्व हंगामातील प्रलंबित भरपाईसाठी राज्य शासनाला विमा कंपन्यांना एकूण २ हजार ८५२ कोटी रुपये राज्य हिस्सा अनुदान देणे आवश्यक होते. राज्य सरकारने आता विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून ही रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना ही रक्कम मिळून लवकरच शेतकऱ्यांनाही विमा भरपाई मिळणार आहे. 

किती भरपाई मिळणार?
शेतकऱ्यांना खरिप २०२२ आणि रब्बी २०२२-२३, खरिप २०२३ आणि रब्बी हंगाम २०२३-२४, खरिप २०२४ या हंगामातील भरपाईपोटी एकूण २ हजार ५५५ कोटी रुपये मिळणार आहेत. ही भरपाईची रक्कम ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
 
कोणत्या हंगामासाठी किती भरपाई मिळणार ?
राज्य सरकारने विमा कंपन्यांना पाठीमागील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता अनुदानही दिले. त्यामुळे मागील विविध हंगामातील भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

खरिप हंगाम २०२४
खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकरी भरपाईची वाट पाहत होते. शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर अंतर्गत एकूण २ हजार ३०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण राज्याने आपला विमा हप्ता दिला नसल्याने भरपाई रखडली होती. मात्र आता राज्याने विमा हप्ता कंपन्यांना दिला. त्यामुळे खरिप हंगाम २०२४ साठी शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपये भरपाई मिळणार आह

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना आता पुढील पीक विमा मिळणार आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Crop insurance update 2555 कोटी पिक विमा मंजूर आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार”

Leave a Comment