Birth Certificate online process आज आपण पाहणार आहोत की घर बसल्याने आपल्या जन्म दाखला कसा काढता येईल या जन्मदाखलाचा उपयोग आपल्याला कसा करता येईल त्याचप्रमाणे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणी लागतील आणि हा जन्म दाखला आपल्याला मोबाईलवर कसा काढता येईल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Birth Certificate online process पूर्ण माहिती
जन्मदाखला हा खूप महत्त्वाचा पुरावा असतो कारण या जन्मजाखल्याच्या आधारे आपल्याला शाळेत ऍडमिशन मिळतं आणि त्यानंतर वयाचा दाखला देखील या जन्म लागल्याच्या आधारे मिळतो जन्मदाखल्याच्या आधारावर आपल्याला आधार कार्ड काढता येतं आणि आधार कार्ड आपल्या सर्व ठिकाणी वापरता येतात ज्यांना दाखला खूपच महत्वाचा असतो आणि हा जन्म दाखला काढण्यासाठी तुम्हाला आता घरी बसल्या तुम्ही कसे काढू शकतात याचे संपूर्ण माहिती आपण विश्लेषण पाहणार आहोत
Birth Certificate online process कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशा अनेक कागदपत्रांचा समावेश होतो. जन्म दाखला हे देखील असेच एक महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. हे कागदपत्र जवळपास सर्वच शासकीय आणि निम शासकीय कामांमध्ये वापरले जाते.
काही योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. जन्म प्रमाणपत्र हे एक असे कागदपत्र आहे जे व्यक्तीचे जन्म ठिकाण, वेळ अन तारीख अधोरेखित करते. हे एक शासकीय कागदपत्र असून या कागदपत्राविना अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात.
जन्म दाखला चा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो कारण जन्म दाखला हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आपल्या सर्वांसाठी आहे विद्यार्थी वयामध्ये तर हा जन्म दाखला म्हणजे खूपच मोठा पुरावा असतो आणि याचाच पुरावाचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण शासकीय योजना असतील किंवा आणखीन कुठल्या वयाच्या दाखल्याच्या योजना असतील याची सर्वांचे कागदपत्र आपण जन्म दाखलावर काढू शकतो
How To Get Birth Certificate
काही अन्य शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी देखील जन्म दाखला चा उपयोग होत असतो. अशा परिस्थितीत आज आपण जन्म दाखला काढण्यासाठी काय प्रोसेस असते आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जन्म दाखला केव्हा काढला जातो
बाळाचा जन्म झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत जन्म दाखला प्रमाणपत्र काढावे लागते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज केल्यानंतर जन्म दाखला अवघ्या एका आठवड्याच्या आत मिळून जातो. दरम्यान आता आपण जन्म दाखला काढण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोसेस नेमकी कशी आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
जन्म दाखला काढण्याची ऑनलाइन प्रोसेस
जन्म दाखला काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. या युजर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून तुम्हाला पुन्हा एकदा या वेबसाईटवर लॉगिन करावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला वेबसाईटवर बर्थ या पर्यायावर क्लिक करून ऍड बर्थ रजिस्ट्रेशन हा पर्याय सिलेक्ट करावा लागणार आहे. मग तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, आईचे नाव, वडिलांचे नाव अचूक भरायची आहे मग हा फॉर्म सेव्ह करायचा आहे.
फॉर्म सेव केल्यानंतर तुम्हाला जन्म दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची फोटो कॉपी स्कॅन करून अपलोड करायची आहे आणि आणि सेव्ह करायचे आहे. मग तुम्हाला अर्जाचा प्रिव्ह्यू दिसेल, तिथे एकदा सगळी माहिती अचूक आहे की नाही ते तपासून घ्यावे लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. मग तुम्हाला एक पावती दिली जाणार आहे. नंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची पावती तुम्हाला दिली जाईल. एकदा अर्ज सबमिट झाला की एका आठवड्यात तुम्हाला जन्म दाखला मिळेल.
ऑफलाइन प्रोसेस कशी आहे.
जन्मदाखला ऑफलाईन काढायचा असेल तर यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जावे लागणार आहे. येथे तुम्हाला जन्म दाखला मिळण्याबाबतचा फॉर्म घेऊन तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून हा फॉर्म जमा करायचा आहे. अशा तऱ्हेने तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.
जन्म दाखल्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात
पालकांचे ओळखपत्र, जन्मस्थान सांगणारा पुरावा (रुग्णालयातील पावती), पालकांच्या लग्नाचे प्रमाणपत्र (पर्यायी)
जन्म नोंदणीसं उशीर झाला तर कोणती कागदपत्रे लागतात?
अर्जदाराचे ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आई-वडिलांचे ओळखपत्र, जन्म झालेल्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र, जन्म रुग्णालयात न झाल्यास पालकांचे शपथपत्र
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला घरबसल्या जन्म दाखला कसा काढता येईल याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा