April ladaki bahin hafta आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाहीये कशामुळे मिळणार नाहीये या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
April ladaki bahin hafta पूर्ण माहिती
राज्यातील माता-भगिनींसाठी महिलांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लाडकी बहीण योजना सुरू केली होती. एक जुलैपासून ही योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिला यांचा लाभ घेत आहे प्रत्येक महिन्याला त्यांना दीड हजार रुपये मिळत आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का आता मार्चपर्यंत सर्व हप्ते वितरण करण्यात आलेले आहेत परंतु आता एप्रिलचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार नाहीये आणि कशामुळे मिळणार नाहीये याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघुयात संपूर्ण माहिती
April ladaki bahin hafta महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत. आतापर्यंत महिलांना ९ हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही.
कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत. या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, असे निकष आहेत.
या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या महिला या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आतापर्यंत ९ लाख महिलांना योजनेतून बाद केले आहेत. मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना पैसे मिळणार नाहीत.
एप्रिलचा हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.
या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार
राज्यातील ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्यांना आता कपात होऊन हजार रुपये उर्वरित पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाहीये याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा