After 12th result आज आपण पाहणार की बारावी परीक्षा बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये आता काही मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत तर काही मुलांना परीक्षेत हा पैसा आलेला आहे तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर आपल्याला काय करता येईल याचे पर्याय आपण बघणार आहोत पूर्ण माहिती.
After 12th result संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे जवळपास 91.28 टक्के हा निकाल लागलेला आहे यामध्ये भरपूर मुलांना यश आलेला आहे काही मुलांना पैसा आलेला आहे तरी काही मुलांना आता वाटतं की कमी मार्क मिळाले आहेत तर अशा मुलांनी काळजी करायची गरज नाही त्यासाठी काही पर्याय असतात या पर्यायांची माहिती आपण बघुयात आणि संपूर्ण माहिती बघुयात
पुनर्मूल्यांकनासाठी काय करावे ?
१) बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
२) छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून दिलेल्या नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
३) ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
श्रेणी/गुणसुधार योजना
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील. जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ७ मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी म्हटले आहे.
बारावीच्या निकालासाठी संकेतस्थळ
– https://results.digilocker.gov.in
– https://mahahsscboard.in
– http://hscresult.mkcl.org
अशाप्रकारे आपण बघितलं की बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये आपल्याला काय काय पर्याय असतात याची माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा