ST JOURNY NEWS आज आपण पाहणार एसटी प्रवाशांसाठी प्रवनसाठी आनंदाची बातमी समोर आहे ती म्हणजे सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे यामुळे तुम्हाला फायदा होणार तुम्ही एसटी प्रवास करत असता तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे
ST JOURNY NEWS संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला माहिती आहे की आता पावसाळ्यामध्ये गणपतीचं नाव आहे त्याचप्रमाणे इतर काही सण येत असतात त्यामुळे एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एसटी प्रवाशांसाठी मोठी सवलत मिळणार आहे या आधी देखील महिलांना अर्ध्या तिकीट आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे परंतु आता सामान्य नागरिकांना देखील याचा लाभ मिळणार आहे बघूयात माहिती
ST JOURNY NEWS एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
1 जूनला एस टी च्या 77 व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ
येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1 जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.
ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ
मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळानं 15 टक्के भाडेवाढ केली होती. या भाडेवाढीचा फटका लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटीचे प्रवासी या निमित्तानं वाढतात का ते लवकरच दिसून येईल.
अशा प्रकारे आपण पाहिलं की एसटी महामंडळ ने कोणता निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांचा फायदा होईल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा