WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online list अकरावी प्रवेशाबाबत  विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online list आज आपण पाहणार आहोत की राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे अकरावी प्रवेश विषयक मोठे अपडेट आलेले आहेत तर याविषयी आपण माहिती बघणार आहोत

11th online list संपूर्ण माहिती

राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची समोर बातमी येत आहे ती म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की दहावीचा निकाल लवकर लावला अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू रहित पार पाडण्यासाठी दहावीचा निकाल लवकर लावला पण त्याचा काही एवढा फायदा झालेला नाही कारण अकरावीच्या वेबसाईट मध्ये सर्व डाऊन किंवा यादी वेळेवर लागणे यामुळे विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेले आहे आणि तो उशीर भरपूर होत आहे त्यामुळे अकरावीचे वर्ग काय लवकर सुरू होणार नाहीत याविषयी आपण माहिती बघूया

11th online list दहावीचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भुलभुलैया पाहता, येत्या 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. याउलट खासगी व बेकायदेशीर असलेल्या ऍकॅडमींमध्ये अकरावीचे वर्ग कधीच सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळाला तरी तो नावापुरताच राहणार असून, यंदाही महाविद्यालयातील वर्ग रिकामे, तर ऍकॅडमी मात्र ‘फुल्ल’ राहण्याचीच परिस्थिती आहे. शिक्षणमंत्री, तसेच शिक्षणाधिकाऱयांच्या गलथान कारभारामुळे शिक्षण खात्याचाच बट्टय़ाबोळ उडाल्याचे चित्र आहे.

यंदा दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन वर्गही लवकर सुरू होतील, अशी आशा होती. या वर्षी प्रथमच राज्यस्तरावरून एकच अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पण यामध्ये वारंवार होत असलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांसह पालक हैराण झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या जिकडे-तिकडे एक लाख ते तीन लाख रुपयांची भरमसाट फी घेऊन बेकायदेशीर खासगी ऍकॅडमींचे पेव फुटले आहे. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना हे परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी आजही महाविद्यालयातील प्रवेश सुखकर आहे.

खासगी ऍकॅडमींतील प्रवेशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिसंख्येवर परिणाम होत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता, इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. पैशांअभावी खासगी ऍकॅडमींत प्रवेश घेता येत नसलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. शिक्षण विभागाला ही परिस्थिती माहीत असतानाही त्यांच्याकडून याबाबत काही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे महाविद्यालयांसह खासगी ऍकॅडमी ही एक समांतर यंत्रणाच तयार झाली आहे.

खासगी व बेकायदेशीर ऍकॅडमीची पद्धत मोडीत काढण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी घेण्याची चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा वाटत होता. मात्र, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील शिक्षण विभागाच्या गोंधळाचा फायदा ऍकॅडमी, तसेच खासगी कनिष्ठ महाविद्यालयांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
एकीकडे अजूनही अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा घोळ सुरू असून, येत्या 15 जुलैपर्यंत अकरावीचे वर्ग सुरू होणार नाहीत, असे ठाम मत जबाबदार महाविद्यालयातील प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे.

त्यामुळेही बहुतांशी विद्यार्थ्यांसह अनेक पालकांनी खासगी कनिष्ठ महाविद्यालयासह ऍकॅडमीतच प्रवेश घेणे पसंत केल्याचे चित्र आहे.सध्या ऍकॅडमीत प्रवेश ‘फुल्ल’ झाले असून, त्यांचे अकरावीचे वर्गही सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया नावापुरतीच राहणार असल्याचेही चित्र आहे.

अशाप्रकारे आपण बघितलं की या अकरावीच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी बातमी कोणती आहे याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.

Leave a Comment