New election card apply आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला इलेक्शन कार्ड हे मोबाईलवर घरी बसल्या काढता येईल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत यासाठी अर्ज कसा करायचा त्याचप्रमाणे इलेक्शन कार्ड हे आपल्याला कसे काढता येईल डाउनलोड कसे करायचे याची माहिती आपण घेऊयात
New election card apply पूर्ण माहिती
आपल्याला प्रत्येक कामासाठी काहीना काही शासकीय पुरावा लागत असतो यातच आता एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे मतदार ओळखपत्र हे मतदार ओळखपत्र अत्यंत महत्त्वाचा आहे आधार कार्ड प्रमाणे याला देखील एक चांगली ओळख आहे इलेक्शनच्या वेळेस आपल्याला हे कामाला येतं त्याच वेळेस अनेक ठिकाणी आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून मतदार कार्ड हे देखील आपल्याला कामाला येतात तर हेच आपल्याला कसं काढता येईल बघुयात
आपण जेव्हा एखादे सरकारी काम करण्यासाठी कार्यालयात जातो तेव्हा तासंतास रांगेत उभ रहावे लागते. मात्र आता तुम्हाला तासंतास रांगेत उभं रहाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये काही प्रक्रिया करून ऑनलाईन पद्धतीने सरकारी कामे करता येणार आहे. तसेच तुम्हाला जर तुमचं मतदार ओळखपत्र काढायचं असल्यास तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या काढू शकता.
आपल्याकडे कोणतेही सरकारी काम असो त्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला लांबच्या लांब रांगेत किंवा तासंतास अधिकाऱ्यांची वाट बघत बसल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. मात्र आता डिजिटल इंडियानंतर संपूर्ण समीकरण बदलले आहे. आता तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमचा स्मार्टफोन घेऊन तुम्हाला हवं असलेल्या सरकारी कामाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
मोबाईलवर या स्टेप फॉलो करा
अशातच आता तुम्हाला जर मतदानाचे ओळखपत्र काढायचे असल्यास कोणत्याही सरकारी कार्यालयाबाहेर उभं न राहता फक्त या सोप्या पद्धतीने तुमच्या फोनमधून प्रक्रिया पूर्ण करून तुमचं ऑनलाईन मतदान ओळखपत्र काढता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण प्रोसेस…
‘व्होटर हेल्पलाइन’ डाऊनलोड करा
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमध्ये जाऊन ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे ॲप इन्स्टॉल करावे लागेल.
यानंतर मतदार नोंदणीवर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यातील ‘नवीन मतदार नोंदणी’वर टॅप करा.
त्यानंतर फॉर्म 6 वर टॅप करा. येथे तुम्हाला लेट्स स्टार्टवर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवा इंटरफेस दिसेल. त्यावर तुम्हाला ‘होय मी प्रथमच अर्ज करीत आहे’ हा पर्याय निवडा आणि नंतर नेक्स्टवर टॅप करा.
तुमचे तपशील पूर्णपणे भरा
समोर स्किनवर तुमचे तपशील भरावे लागणार आहे. यात दिलेल्या पर्यायात तुमचे राज्य निवडा, तुमचा जिल्हा व तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा. त्यानंतर पर्यायमध्ये आता तुमची जन्मतारीख प्रविष्ट करा.
जन्मतारखेच्या नोंदणीसाठी डॉक्यूमेंट पर्यायावर क्लिक करा आणि त्यात आधार कार्डचा फोटो अपलोड करा. फोटोचा आकार २०० केबीपेक्षा मोठा नसावा. त्यानंतर नेक्स्ट वर टॅप करा. आता तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून फोटो अपलोड करा. यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर निवडावे लागेल. व पुढे तुमचे नाव प्रविष्ट करा. तसेच मोबाईल नंबर आणि नंतर तुमचा ईमेल आयडी प्रविष्ट करा.
शेवटच्या टप्प्यात हे फॉलो करा
यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नवीन पर्याय दिसतील.यावर तुम्हाला तुमचे नाते या ऑप्शनवर क्लिक करा. उदाहरणार्थ तुम्ही तुमचे वडील हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर त्याखाली वडिलांचे नाव लिहा. आता पुढे तुमचा संपूर्ण पत्ता दिलेल्या पर्यायाप्रमाणे भरून घ्या. त्यानंतर पुढे क्लिक करा तुमचे पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते लिहा. यानंतर तुम्ही तुमचा पिन कोड टाका. आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ निवडावा लागेल. अशा रीतीने तुमचे मतदान ओळखपत्र तयार होते.
दरम्यान ही गोष्ट लक्षात ठेवा की, या सर्व प्रक्रियेत तुम्हाला कोणतेच पैसे मोजावे लागत नाहीत. ही संपूर्ण प्रोसेस पूर्णपणे विनामूल्य आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की मोबाईलवर आपल्याला घरी बसल्या कशाप्रकारे इलेक्शन कार्ड काढता येईल याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा