WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th Admission Documents 11वी प्रवेशासाठी ही कागदपत्र लागणार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th Admission Documents आज आपण पाहणार की अकरावी प्रवेशासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेले आहे त्यामध्ये त्यांना कोणते कागदपत्र लागतील त्यासाठी त्यांना काय करावे लागेल आणि अकरावी प्रवेशासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कोणते कागदपत्रांची जास्त आवश्यकता असते ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणते अडचण येणार नाही याची माहिती आपण आज घेणार आहोत.

11th Admission Documents संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्त्वाचा प्रश्न असतो निकालानंतर तो म्हणजे आपल्याला 11 वी जो प्रवेश घ्यायचा असतो या अकरावी प्रवेशांमध्ये त्यांना कोणते कागदपत्रे लागतील तर तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो आणि ते कागदपत्रांची यादी तुमच्याकडे नसते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रायटेरिया असतात जर तुम्ही ओपन गटत असतील तर तुम्हाला वेगळे कागदपत्र लागतात तुम्ही कास्ट कॅटेगिरी मध्ये असाल तर तुम्हाला वेगळे कागदपत्रे लागतात ओपन कॅटेगरी असतात त्यांना फक्त त्यांचा रिझल्ट आणि त्यांचा दाखला याव्यतिरिक्त कुठले कागदपत्र लागत नाही परंतु जे कास्ट कॅटेगरीत असतात त्यांना काही सवलती असतात त्याच्यामुळे त्यांना कागदपत्रांची लिस्ट बनवी लागते याविषयीचा पण आज माहिती पाहणार आहोत.

11th Admission Documents इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे यावर्षीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 19 मे पासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रीयेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? याची संपूर्ण यादी या लेखात दिलेली आहे.

यावर्षी महाराष्ट्र शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठीmahafyjcadmissions.in ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
1. इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
2. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
3. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला (लागू असल्यास)
4. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. EWS पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6. दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
8. आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास)
9. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
10. अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
11. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक. (लागू असल्यास)
बदली आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter) (लागू असल्यास)
(राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)

अशाप्रकारे आपण पाहिलं की अकरावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रवेशासाठी कोणते कागदपत्रे लागतील याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट सर्विस सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment