PM MATRUTAV YOJANA आज आपण बनारसी राज्यातील कोणत्या महिलांना 6000 रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारची कोणती योजना याची माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायला लागेल किंवा ऑनलाईन करावी लागेल याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
PM MATRUTAV YOJANA संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी त्यांच्या आर्थिक विकासासाठी राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळे योजना नेहमीच राबवत असतात आणखीन एक योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना 6000 रुपये मिळणार आहेत आणि हे कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी त्यांना काय करावे लागेल पात्रता काय असतील निकष काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत याआधी महाराष्ट्रात जवळपास माजी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळतात आता आणखीन एक योजना आहे केंद्र सरकारची त्याच्यात 6000 रुपये मिळणार आहेत तर बघुयात त्याविषयी संपूर्ण माहिती.
PM MATRUTAV YOJANA ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’योजना केंद्र सरकारने २०१७ मध्ये सुरू केली असून, या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना नियमित आरोग्य तपासणी मिळावी आणि पोषणयुक्त आहार वेळेवर उपलब्ध व्हावा, हा आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला ५,००० रु अनुदान दिले जाते.
२०२४-२५ मध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसाठी ५ लाख ६८ हजार ४३६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. त्यापैकी ५ लाख १ हजार २०४ अर्जाची नोंदणी करण्यात आले आहे..
मातृवंदना योजनेअंतर्गत २०१७ ते मार्च २०२४ या कालावधीत ३५ लाख महिलांनी लाभ घेतला आहे. यावर १,३८८ कोटी रुपयांहून अधिक अनुदान वाटप करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने शहरी व ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. गर्भवतीपण आणि बाळंतपणाच्या काळात महिलांना आरोग्य सेवा आणि सुविधा, तसेच प्रोत्साहनाद्वारे कुपोषणाचा प्रभाव कमी करणे आणि मातां व बालकांचे आरोग्य सुधारण्याचे हे योजनेचे मुख्य उद्देश आहे.
गर्भवतींसाठी फायदे
या तपासणीत हिमोग्लोबिन, रक्त, शुगर लेव्हल, रक्तदाब, वजन आणि इतर सामान्य तपासण्या समाविष्ट केल्या जातात. गर्भवती महिला ३ ते ६ महिन्यांच्या गर्भधारणेच्या टप्प्यावर सरकारी दवाखान्यात, आरोग्य केंद्रात किंवा संबंधित खासगी दवाखान्यात वेळेवर तपासणीसाठी संपर्क साधू शकतात. या योजनेमुळे भारतातील माता मृत्युदर कमी होण्यास महत्त्वपूर्ण मदत होईल.
लाभ किती मिळतो?
‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजनेअंतर्गत महिलांना एकूण ₹5,000/- पर्यंतचा लाभ तीन हप्त्यांमध्ये दिला जातो:
पहिला हप्ता – ₹1,000/-: गर्भावस्थेच्या सुरुवातीला आंगणवाडी केंद्र किंवा मान्यताप्राप्त आरोग्य केंद्रात नोंदणी केल्यावर.
दुसरा हप्ता – ₹2,000/-: गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यानंतर, किमान एक अँटी-नॅटल चेक-अप (ANC) केल्यानंतर.
तिसरा हप्ता – ₹2,000/-: बाळाच्या जन्मानंतर, जन्म नोंदणी झाल्यावर आणि बाळाने BCG, OPV, DPT, आणि हिपॅटायटिस-B लसींचा पहिला डोस घेतल्यावर.
याशिवाय, जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत संस्थात्मक प्रसुतीसाठी ₹1,000/- ची अतिरिक्त मदत दिली जाते. त्यामुळे एकूण ₹6,000/- पर्यंतची मदत मिळू शकते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना ₹6000 मिळणारे त्याची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईट करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा