11th addmission process आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेशासाठी काय नियम बदललेत का विद्यार्थ्यांसाठी काय महत्वाची बातमी आहे याची माहिती आपणास घेणार आहोत अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही ना काही अडचण येत आहे त्याच्यामध्ये आता एक मोठी आणखीन अडचण तयार झालेले आहेत त्यामुळे आता शिक्षण विभाग काही निर्णय घेणार सरकार काय निर्णय घेणार याची माहिती आपण घेऊयात.
11th addmission process संपूर्ण माहिती
राज्यातील अकरावी प्रवेश दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच सुरू झाले प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन-तीन दिवसातच वेबसाईट सर्वर डाऊन झाला त्यामुळे परत ती प्रवेश प्रक्रिया बंद झाली आणि त्यानंतर आता परत ती प्रवेश प्रक्रिया ही सव्वीस तारखेपासून म्हणजे कालपासून सुरू केली आहे आता महाराष्ट्रात सर्वत्र अकरावीचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावे अशा प्रकारे राज्य सरकार शिक्षण विभागाने सांगितलेला आहे परंतु आता त्याला काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे आणि अकरावीचे जे प्रवेश प्रक्रियेची लिंक आहे ती देखील काही वेळेस सर्व डाऊन होतोय काही वेळेस चालतो त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील तांत्रिक अडचण येत आहेत तर कोणत्या भागात आता विरोध होतो आणि कशामुळे होतो याचीच माहिती आपण घेणार आहोत
11th addmission process इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवताना पूर्व तयारीचा अभाव दिसून येत असून ग्रामीण व दुर्गम भागातील (rural and remote areas) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरीता नसलेली साधनसिद्धता, प्रवेश प्रक्रियेस लागणारा खर्च करण्याची असमर्थता आणि ग्रामीण भागात सद्यस्थितीत पारदर्शकतेने चालणारे अकरावीचे प्रवेश, या सर्व स्थितीचा विचार करून ग्रामीण भागासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अमलात आणू नये, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार ज.मो. अभ्यंकर (MLA J.M. Abhyankar)यांनी केले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
ग्रामीण भागातील बऱ्याच गावांत इंटरनेट सेवा अनुलब्ध नसल्यामुळे, या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी जावून सायबर कॅफेतून २०० – ३०० रुपये खर्च करून अर्ज सादर करावा लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ अथवा त्यांच्या पालकांजवळ ऑनलाईन प्रवेशास योग्य असे मोबाईल उपलब्ध नाहीत.सर्वच विद्यार्थ्यांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे १०० रुपये शुल्क आणि सायबर कॅफेचे २००-३०० रुपयांचे देयक अदा करणे अडचणीचे ठरणार आहे. यापूर्वीच्या अनुभवानुसार शहरातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सप्टेंबर महिना उजाडतो. बऱ्याचदा हे प्रवेश ऑक्टोंबरपर्यंत चालू राहील्यामुळे प्रथम सत्रात ११ वी चे वर्ग फारच कमी काळ भरविले जातात. परिणामतः इयत्ता ११ वी चा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कालावधी उपलब्ध होत नाहीत. तोच प्रकार ग्रामीण भागातील ११ वीच्या वर्गांसाठी होईल, असे अभ्यंकर म्हणाले आहे
सद्यस्थितीत ग्रामीण भागातील अथवा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंमलात नसलेल्या सर्व ठिकाणी शाळाप्रमुख ऑफ लाईन प्रवेश पंधरा दिवसात पूर्ण करून वर्ग कार्य जुलैच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सुरु करतात. ऑनलाईन प्रवेशामुळे वर्ग कामास उशिरा प्रारंभ होईल. ऑनलाईन प्रवेश पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अशा ग्रामिण भागात शासनाचे संबंधित अधिकारी उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे योग्य त्या मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकणार नाही आणि त्यांना ११ वी प्रवेशाला मुकावे लागेल.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंमलात आणण्यापूर्वी सर्व मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन होणे आवश्यक होते. अडचणी निर्माण झाल्यास, त्याबाबत कुठे आणि कुणाकडे मार्गदर्शन, मागावे याबद्दलचा तपशिल संबंधितांना अवगत करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे कार्यवाही झालेली नाही.
ग्रामीण भागातील ११ वी चे प्रवेश देतांना मुख्याद्यापक गुणवत्तेच्या निकषाकडे दुर्लक्ष करतात अथवा प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसते, अशा तक्रारी ऐकावयास मिळत नाहीत.
उलट ११ वी प्रवेशाकरिता उपलब्ध जागा अधिक आणि प्रवेशेच्छ्र विद्यार्थी कमी अशी स्थिती असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सहजपणे ११ वी मध्ये प्रवेश मिळतो.त्यामुळे ग्रामीण व दूर्गम भागासाठी अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवू नये,अशी मागणी अभ्यंकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अशा प्रकारे आपण पाहिलं की अकरावी प्रवेश बाबत आपण एक महत्त्वाची अपडेट बघितलेले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा