11th addmission online आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेश प्रक्रिया बंद झालेले आहे आता विद्यार्थ्यांना नवीन तारिक दिलेली आहे या तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत नेमकी कोणती तारीख आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाले होते परंतु काही कारणास्तवती बंद झालेले आहेत याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
11th addmission online संपूर्ण माहिती
राज्यातील दहावीचा बोर्डाचा निकाल लागला त्यानंतर लगेच राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहेत यामध्ये आता राज्यात सर्वत्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत परंतु सुरू झाल्यानंतर लगेच वेबसाईट ही बंद झाली आहे कशा कारणास्तव बंद झालेले आहेत आणि आता कोणत्या तारखेला ही वेबसाईट परत सुरु होणारे यासाठी विद्यार्थी पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे याविषयी आपणास संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे काही शिक्षक संघटनेत देखील याला विरोध केलेला आहे की काही ठिकाणी आता ही अकरावीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे याविषयी आपण बघूया पूर्ण विश्लेषक माहिती.
11th addmission online राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपता संपेना झालाय. शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार असून पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हाच सुरू होईल. त्यामुळे, गेल्या 2 दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडप़ड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी 4 दिवस थांबावे लागणार आहे.
21 मे रोजी बुधवारी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाइन अकरावी प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईट मधील तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर, आता महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून 26 मे ही नवी तारीख देण्यात आली असून 26 मे ते 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल.
राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर, 5 जून रोजी पहिली जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे. 6 ते 7 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या हरकती नोंदवून तक्रार करता येईल. त्यानंतर, 8 जून रोजी अंतिम जनरल मेरीट लिस्ट जाहीर होईल.
26 मे पासून ऑनलाइन प्रवेश, नोंदणी
राज्यात शासनाची वेबसाईट सुरू होताच अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे, आता ही प्रवेश प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच दिनांक 26 मे पासून सुरू होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमांक निवडता येतील, त्यासोबतच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येणार आहे. तर, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर होईल, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
पोर्टलची सुविधा 4 दिवस बंद
दरम्यान, यापू्र्वी 21 मे रोजी सुरू करण्यात आलेली विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, ती प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच, विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेलवर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटलं आहे.
तांत्रिक अडचणींनी विद्यार्थी त्रस्त
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातीलमहाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. यावर शिक्षण संचालनालयकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे
अशाप्रकारे आपण पहिला की अकरावीची प्रवेश प्रक्रिया कोणत्या कारणास्तव बंद झालेली आहे आणि ती कधी सुरू होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा