11th addmission list आज आपण पाहणार की अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे कोणत्या तारखेला कोणत्या वेळेतही विद्यार्थ्यांसाठीही कामात्वाची आहे याची माहिती आपण आज बघणार आहोत त्यामुळे अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे
11th addmission list संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार आहे शिक्षण विभागाने नेहमीच गोंधळ केलेला आहे दोन-तीन वेळा वेळापत्रक बदलले नेमके आज तरी यादी जाहीर होईल का याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागलेला आहे त्यामुळे कोणत्या वेळेस ही यादी जाहीर होईल आणि विद्यार्थ्यांनी त्यावेळेस काय करायचं आहे यादी कशी भरायची याची माहिती आपण घेऊयात
11th addmission list राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की पुन्हा प्रक्रिया लांबणीवर पडणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण अल्पसंख्यांक संस्थांतील आरक्षण निर्णयातील बदल आणि तांत्रिक अडचणीमुळे गुणवत्ता यादी जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे.
राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना होत आलाय. मात्र, अजूनही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीमध्ये प्रवेश झालेला नाही. विद्यार्थी अजूनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. या पहिला गुणवत्ता यादीची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
शिक्षण संचालनालयाकडून गोंधळ सुरूच
जवळपास 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून नोंदणी केली आहे. तीन वेळा वेळापत्रक बदलल्यानंतर आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही गुणवत्ता यादी जाहीर करण्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाकडून गोंधळ सुरू आहे. यामध्ये मुख्यत्वे करून सॉफ्टवेअर, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी आणि अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणासंबंधी झालेला गोंधळ, बदललेला निर्णय यामुळे हा उशीर गुणवत्ता यादी जाहीर करण्यास लागत असल्याची माहिती आहे.
पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी जाहीर होणार?
अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीबाबत सविस्तर बाबी आज दुपारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिककडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी आज सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लांबणीवर कसे पडले?
यावर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लवकर पार पडून अकरावीचे शैक्षणिक वर्ष लवकर सुरू व्हावे, यासाठी दहावी बोर्ड परीक्षा दोन आठवडे लवकर घेण्यात आली.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकालही दोन आठवडे लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेऊन 13 मे रोजी हा निकाल जाहीर केला.
13 मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 19 मे रोजी राज्यभरातील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यामध्ये 21 मेपासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवेश प्रक्रिया राबवताना अडचणींना सामोरे जावं लागलं आणि 21 मे ऐवजी अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलून ती 26 मे करण्यात आली.
या सगळ्या तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकानुसार 3 जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर नवीन वेळापत्रक बनवण्यात आले आणि यामध्ये 10 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले.
यात अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरायचा राहिल्याने पुन्हा एकदा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी देण्यात आला. शिवाय इतर तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ घेऊन पहिली गुणवत्ता यादी थेट 26 जूनला जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणाचा विषय आणि त्यातील गोंधळ समोर आल्यानंतर अल्पसंख्यांक संस्थांमध्ये आरक्षणाचा पूर्वीचा निर्णय अंमलात आणण्यात आला. त्यानुसार पुन्हा एकदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती आहे.
त्यामुळे आज वेळेत पहिली गुणवत्ता यादी जाहीर व्हावी, यासाठी शिक्षण संचालनालयाकडून जरी प्रयत्न केले जात असले तरी यादी जाहीर होणार की लांबणीवर पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज लागणार या विषयी माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Yenegur
I got 85.80% in 10th in year 2024-25
And i am intrested in diploma in engineering
So please check my marks and select me for nice engineering collages
I want to check the website
कुठे झाली आहे यादी जाहीर पोर्टल वरती अपडेट आहे की 30 जून ल होणार आहे जरा विचार करून हेडिंग टाका, उगाच trp साठी काहीपण हेडिंग टाकतात