WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wall anudan yojana विहीर घेण्यासाठी सरकार अनुदान देणार आताच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wall anudan yojana आज आपण पाहणार आहोत की आपल्याला विहीर घेण्यासाठी आता सरकार अनुदान देणार आहे विहीर घेण्यासाठी किती अनुदान मिळणार कोणाला मिळणार या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत त्याच पण अर्ज कुठे करायचा कागदपत्र काय लागतील त्याचप्रमाणे पात्रता निकष काय आहे अर्ज आपल्याला कुठे भरायचा आहे पैसे किती मिळतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहूया.

Wall anudan yojana पूर्ण माहिती

तुम्हाला माहिती आहे का राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा भरपूर विचार करत असतो शरण शेतकरी असेल तरच सर्वे प्रजा सुखी असते अर्थातच शेतकऱ्यावरून सर्व अर्थव्य संकल्प हा अवलंबून असतो त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी घेणे हे राज्य सरकारचा कर्तव्य आहे वेळोवेळी त्यांना अनुदान देणे त्याचप्रमाणे सरकारी योजनेचा त्यांचा लाभ मिळावा म्हणून त्यांना मदत करणे आता त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जर विहीर घ्यायचे असेलही त्यांच्या पाण्यासाठी भरपूर महत्त्वाचे असते कारण त्या विहिरीमध्ये पाणी असेल तर शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे आपली शेती करत असतात पावसाळ्यात पाणी जमा करता येत असतो त्या विहीर चा उपयोग भरपूर त्यांना होत असतो परंतु विहीर घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात परंतु आता हे पैसे राज्य सरकार देणार आहे ते कोणाला देणार कशाप्रकारे मिळणार बघूया संपूर्ण माहिती.

Wall anudan yojana अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात असून यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.

या योजनेतून प्रत्येक वर्षी विहिरी खणल्या जात आहेत. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे.

प्रत्यक्षात ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे राबवली जाते. लाभार्थीसाठी अनुदान समाज कल्याण विभागातर्फे दिले जाते. योजनेतून बऱ्याच विहिरी खोदल्या जात असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

विहिरींची कामे उन्हाळ्यातच का करतात?

पावसामुळे चिखल आणि पाण्यामुळे विहिरीचे काम करता येत नाही. यासाठी विहिरींची कामे उन्हाळ्यातच केली जातात.

उन्हाळ्यात कमी काम

शेतकऱ्याला उन्हाळ्यात इतर शेतीची कामे कमी असतात. अन्य कामाच्या व्यापातून वेळ मिळतो.

निवड समितीत कोण?

लाभार्थी निवडीसाठीची समिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असते. यामध्ये सहा सदस्य कार्यरत असतात.

एका लाभार्थ्याला किती अनुदान?

योजनेतील पात्र लाभार्थ्याला नवीन विहिरीसाठी अडीच लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोरिंगसाठी २० हजार रुपये, कृषिपंपासाठी २० हजार, वीज जोडणीसाठी दहा हजार रुपये, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख, ठिबक सिंचनासाठी ५० हजार, तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपये अनुदान मिळते.

पात्रता आवश्यक आणि कागदपत्रे

शेतकरी नवबौद्ध, अनुसूचित जातीमधील असावा, सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला असावा, नवीन विहिरीसाठी कमीत कमी एक एकर जमीन असावी, शेतकऱ्याच्या नावे सात बारा, आठ अ असावा, विहिरीशिवाय इतर लाभ घेण्यासाठी कमीत कमी २० गुंठे जमीन असावी, लाभार्थीचे बँक पासबुक झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आतील असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती

कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

अशाप्रकारे आपण पाहिलं की सरकार विहीर घेण्यासाठी आपल्याला किती अनुदान देण्यास कोणाला देणार याची संपर्क माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment