WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Std 5th to 8th passing rules 5वी ते 8वी ढकलपास पद्धत बंद शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Std 5th to 8th passing rules आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पाचवी ते आठवी ढकल्पास पद्धत बंद करण्यात आलेले आहेत नेमकी ही पद्धत बंद झाल्यामुळे आता पासिंग पद्धत कशी असणार त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी आता काही नियम बनवलेले आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Std 5th to 8th passing rules पूर्ण माहिती


गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात मध्ये पहिली ते आठवीपर्यंत ढकल्पास पद्धत होती म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करो अथवा न करो तो पुढच्या वर्गात जात होता त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काही भीती राहिली नव्हती आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान कुठेतरी होत होतं अशा प्रकारे शिक्षण तज्ञांचे मत होतं यावर बऱ्याच वेळेस विचार करण्यात आला आणि त्यावेळेस आता शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे की या वर्षापासून आता पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांना आता डकल्पास पद्धत बंद असणार आहे त्यामुळे त्यांना अभ्यास करून आता पास व्हावे लागेल याआधी देखील डकल्पास पद्धत चालू होण्याच्या आधी महाराष्ट्रात पहिली ते दहावीपर्यंत आपल्याला परीक्षेत पास होऊनच पुढे जाता येत होतं परंतु मध्यंतरी काही काळात हा नियम बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे अशा प्रकारचे खंत आता विद्यार्थी पालकांकडून व्यक्त होत आहे आता नेमकी पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पासिंग नियम ठरलेले आहेत याची माहिती आपण बघुयात.

Std 5th to 8th passing rulesइयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल, पण अंतिम सत्र परीक्षेत दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यास २१ गुण मिळाले तरच तो उत्तीर्ण होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ५ ते २५ एप्रिल या काळात होणार आहे. पण, अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करता येणार नाही. अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटीत संबंधित विषय शिक्षकाने अतिरिक्त अध्यापन करून त्याची जूनमध्ये फेरपरीक्षा घ्यायची आहे. त्यात तो उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

पण, अनेकदा काही शिक्षक पुढील उठाठेव नको म्हणून तोंडी परीक्षेत १० पैकी १० गुण देतात आणि लेखी परीक्षेला तो विद्यार्थी पास होईल इतके गुण देतात, अशीही चर्चा आहे. मात्र, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानकपणे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्यास त्या विषय शिक्षकावर कारवाई होऊ शकते.

उत्तरपत्रिकांची होणार अचानक पडताळणी

पाचवी व आठवीच्या सरसकट विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत बंद झाली असून त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, अशा सूचना सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यांच्या उत्तरपत्रिका २० वर्षे जतन करून ठेवाव्या लागणार असून अचानकपणे कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे.
– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी

उत्तीर्ण होण्याचे समीकरण असे.

इयत्ता पाचवी : दहा गुणांची तोंडी तर ४० गुणांची लेखी परीक्षा होते. पाच विषयांची एकूण २५० गुणांची परीक्षा होईल. प्रत्येक विषयात किमान १८ गुण पडलेला विद्यार्थी उत्तीर्ण होतो.

इयत्ता आठवी : दहा गुणांची तोंडी आणि ५० गुणांची लेखी परीक्षा होते. या विद्यार्थ्यांना एकूण सहा विषय असतात. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यास किमान २१ गुण आवश्यक आहेत.

त्यामुळे उत्तरपत्रिका २० वर्षे जतन करून ठेवाव्या लागणार आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जायचे. परंतु आता ही पद्धत बंद केली आहे. विद्यार्थ्यांना आता परीक्षेत चांगले गुण मिळवावे लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना कमीत कमी गुण मिळाले तरच त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. अन्यथा त्यांना नापास करण्यात येणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थ्यांना पाचवी ते आठवी आता अभ्यास करून पास व्हावे लागणार आहे ढकल्पास पद्धत बंद झालेले आहे आमचे सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर नक्की फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment