WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST MAHAMANDAL UPDATE एसटी प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST MAHAMANDAL UPDATE आज आपण पाहणार आहोत की एसटी प्रवाशांसाठी साठी कोणती मोठी आनंदाची बातमी आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठे आनंदची बातमी समोर येत आहे तर बघूया संपूर्ण माहिती

ST MAHAMANDAL UPDATE पूर्ण माहिती


राज्यातील महाराष्ट्र राज्यातील एसटी धारकांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेली लाल परी अशा नावाने ओळख असलेली आपले सर्वांचे आवडते आणि प्रिय कारण आपल्याला महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात लाल परी पोहोचून सुरक्षित पोहोचत नेते संदर्भात एक मोठे निर्णय घेतलेला आहे महामंडळात याबाबत समोर येत आहे.

ST MAHAMANDAL UPDATE आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. फडणवीस सरकारने एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी बीओटी म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर स्थानकांचा विकास करण्याचा मोठा निर्णय घेतला असून या अंतर्गत आता राज्यात काही नवीन बसस्थानक विकसित होणार आहे

यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीपासून या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. चोपडा बस स्थानक हे गुजरात राज्यातील बसपोर्ट प्रकल्पाच्या धरतीवर विकसित केले जाणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली की, “गुजरातच्या बसपोर्ट प्रकल्पाचा अभ्यास करून महाराष्ट्रातील एसटी स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात चोपड्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि आंबोली या बसस्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

म्हणजेच राज्यातील एकूण चार बस स्थानकाचा पहिल्या टप्प्यात समावेश राहणार असून या संबंधित बस स्थानकाचा कायापालट होणार आहे आणि यामुळे या भागातील नागरिकांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.
राज्यातील सर्व एसटी स्थानकांना प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर व अत्याधुनिक बनविण्याचे धोरण महामंडळाने निश्चित केले आहे. पुढील टप्प्यात इतर शहरांतील बसस्थानकांचाही विकास करण्यात येणार आहे.
अत्याधुनिक तिकीट प्रणाली, आरामदायी प्रतीक्षागृहे, स्वच्छतागृहे, फूड कोर्ट, आणि प्रवाशांसाठी डिजिटल माहिती फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नक्कीच, या सोयी सुविधांचा राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

चोपडा बसस्थानक बनणार हायटेक खरेतर, चोपडा हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र असून, मध्यप्रदेशच्या सीमेलगत असल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. स्थानिक आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी चोपडा बसस्थानकाचा विकास बसपोर्टच्या धर्तीवर करण्याची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहानंतर या स्थानकाच्या पुनर्विकासास मान्यता देण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 नवीन स्थानक अन एका स्थानकात आधुनिक सुविधा

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, येथील बसस्थानकाला अधिक सुविधा देण्याची गरज आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीसाठी आधुनिक बसस्थानक उभारण्याची मागणी केली होती, त्यास सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

तसेच, सावंतवाडी व दोडामार्ग या ठिकाणीही नव्या बसस्थानकांची उभारणी करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मिळणार भेट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एसटी महामंडळात प्रवाशांसाठी कोणता निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा

Leave a Comment