SSC SCIENCE BOARD PAPER आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा पेपर फुटला आहे नेमका कोणत्या विषयाचा पेपर फुटला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेल आहे त्याचप्रमाणे राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे तर बघूयात की आपण बोर्डाच्या कोणत्या विषयाचा पेपर फुटला आहे.
SSC SCIENCE BOARD PAPER पूर्ण माहिती
राज्यात 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा या अत्यंत महत्त्वाचे असतात यामध्ये आता बारावीच्या बोर्डाचे पेपर संपले आहेत दहावी बोर्डाचे पेपर चालू आहे यामध्ये विद्यार्थी पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ही बातमी अशी आहे की दहावी बोर्डाचा पेपर चक्क फुटला आहे आता तो राज्यात कोणत्या भागात फुटला आहे यामुळे या पेपराविषयी आता विद्यार्थी पालकांमध्ये एक मोठी संतापाची लाट पसरली आहे कारण विद्यार्थी अभ्यास करत असतात पेपर लिहीत असतात परंतु काही ठिकाणी अशी पेपर फुटीचे प्रकरणामुळे हुशार मुलांवर एक प्रकारे अन्याय होत आहे तर नेमकं बघूयात संपूर्ण माहिती
SSC SCIENCE BOARD PAPER जालना आणि यवतमाळ जिल्ह्यानंतर आता अमरावती जिह्यात पेपरफुटीचे परकरण समोर आले आहे. राज्यात बोर्डाचे पेपर सुरु आहेत. अशामध्ये कॉपीमुक्त परीक्षा बनवण्यासाठी शासनाकडून फार प्रयत्न केले जात आहेत. ७ मार्च रोजी दहावीची गणिताची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अशात पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ही घटना घडली आहे. या महाविद्यालयाच्या १०० मीटरवर असणाऱ्या परिसरातील झेरॉक्स सेंटरमध्ये हे प्रकरण रंगे हात पकडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
दहावी गणिताचा पेपर फुटला आहे. परीक्षा निमित्ताने जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलीस तपासणी सुरु होती. या दरम्यान जिजामाता विद्यालयासमोर विचित्र प्रकार घडलेला दिसून आला आहे. तेथील झेरॉक्स सेंटरमधून शाळेची मुले चक्क उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स काढून नेताना दिसून आले. पोलीस त्या स्थळी पोहचताच विद्यार्थी पळून गेले तर झेरॉक्स सेंटरमधील व्यक्ती झेरॉक्स काढताना दिसून आला. तो व्यक्ती दहावीच्या गणिताच्या पेपरची कॉपी काढून विद्यार्थ्यांना पुरवत होता. त्यामुळे पोलीस या सर्व गोष्टींची शहनिशा करून पुढील कारवाई करणार आहेत. दुकानदार विद्यार्थ्यांना फुटलेल्या पेपरची कॉपी पुरवून मदत करत असल्याने त्यावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अगोदरही पेपरफुटीचे प्रकरण घडून आले होते. हे प्रकरण जालना तसेच यवतमाळ जिल्ह्यात घडले होते. . यवतमाळमधील आदर्श विद्यालय कोठारी या केंद्रावर २२५ प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या. यामध्ये ४ प्रश्नपत्रिका एक्सट्रा पाठवण्यात आल्या होत्या. पण यातील एक प्रश्नपत्रिका चोळमेळा अवस्थेत आढळून आली होती. परीक्षा सुरु होण्याअगोदर दहावीची मराठी परीक्षेची प्रश्नपात्रिका व्हायरल करण्यात आल्याने केंद्र संचालक श्याम तासके आणि इतर एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यात परीक्षेचे वातावरण आहे. अशामध्ये वाढत्या पेपरफुटींच्या प्रकरणांमुळे चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तीच परीक्षा पुन्हा एकदा द्यावी लागणार की काय? या प्रश्नाने भीती तयार झाली आहे. या वाढत्या प्रकरणांवर कठोर निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा कोणत्या विषयाचा पेपर फुटला आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी आत्ताच 9322515123.या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा